म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिका प्रशासनाने ‘सीएसआर’च्या माध्यमातून बाणेर येथे सहामजली अवघ्या पंधरा दिवसांत उभे केले असून, त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांच्या हस्ते शुक्रवारी होणार आहे. सत्तातरांच्या नाट्यानंतर पवार आणि फडणवीस पुण्यात प्रथमच एका व्यासपीठावर येत असून, यानिमित्ताने राजकीय जुगलबंदी पुणेकरांना पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात जंबो रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. त्याखालोखाल क्षमता असलेले रुग्णालय बाणेर येथे सहामजली इमारतीत उभे करण्यात आले आहे. या रुग्णालयात ३१४ खाटा असून, २७० ऑक्सिजनसज्ज खाटा आणि ४४ व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने ‘सीएसआर’च्या माध्यमातून हे रुग्णालय उभे केले असून, अवघ्या पंधरा दिवसांत त्याचे काम पूर्ण केले आहे. या ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी ‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक’ उभारण्यात आला असून, त्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक ती परवानगीही मिळविण्यात आली आहे. हे रुग्णालय शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार, विरोधी पक्षनेते फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

राज्यातील सत्तांतरानंतर फडणवीस आणि पवार पुण्यात पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकत्र येत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात दोन दादा आणि दोन भाऊ यांची राजकीय जुगलबंदी पाहावयास मिळण्याची शक्यता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here