मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल दरात १० पैशांची वाढ केली. पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.४८ रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव ८०.११ रुपयांवर स्थिर आहे. बुधवारी पेट्रोल दरवाढीला ब्रेक लागला होता. मात्र आज पुन्हा कंपन्यांनी पेट्रोल दरात वाढ केली.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम झाला आहे. मेक्सिकोच्या खाडीत लाॅरा चक्रीवादळाने धडक दिली आहे. चक्रीवादळाच्या इशाऱ्यानंतर मॅक्सोकोतील बड्या तेल विहिरी बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेलाच्या उत्पादनात घट झाली आहे. आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ५ सेंट्सने घसरला आणि प्रती बॅरल ४३.३४ डॉलर झाला. बुधवारी तेलाच्या किमतीत ४ सेंट्सची वाढ झाली होती. ब्रेंट क्रूडचा भाव ४५.६६ डॉलर प्रती बॅरल झाला होता.

पेट्रोलियम कंपन्यांनी आज केल्याने दिल्लीत ८२ रुपयांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचले आहे. तर मुंबईत ८९ रुपयांच्या नजीक पोहोचले आहे. मुंबईत आजचा पेट्रोलचा भाव ८८.४८ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लीटर ८०.११ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८१.८३ रुपये आणि डिझेलचा भाव ७३.५६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.८२ रुपये असून ७८.८६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८३.३३ रुपये आहे. तर डिझेल ७७.०६ रुपये प्रती लीटर आहे.

जागतिक बाजारात मागील महिनाभर कच्च्या तेलाचा भाव स्थिर आहे. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने तेल आयातीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी मागील सहा दिवस पेट्रोल दरात वाढ केली होती. तर जवळपास तीन आठवडे डिझेलची किंमत स्थिर आहे.

देशात भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे जवळपास ९० पेट्रोलपंप आहेत. देशातील इंधनाचे दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहे. त्यामुळे दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा दर निश्चित केला जातो. यापूर्वी पंधरवड्याने इंधन दर आढावा घेतला जात होता. पेट्रोल आणि डिझेलमध्ये स्थानिक कर लागू होत असल्याने देशात त्याचे दर वेगवेगळे आढळून येतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here