मुंबई : महाराष्ट्रासह देशभर सध्या पावसानं जोर पकडला आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भासह आणि मराठवाड्यात नांदेड, लातूरमध्ये जोरदार पाऊस पडतोय. यंदा मान्सूनचं आगमन उशिरानं झालं होतं. दरवर्षी मान्सूनचं आगमन १ जूनला केरळमध्ये होतं. केरळमध्ये मान्सून यंदा ८ जूनला दाखल झाला. बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सूनच्या प्रवासावर परिणाम झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रात ११ जूनला मान्सून पोहोचला होता त्यानंतर मान्सूनचा प्रवास रखडला होता. जून आणि जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होतं. जुलैच्या पहिल्या पंधरा दिवसात उत्तर भारतात पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसानं जोर पकडला आहे. तेलंगाणामध्ये तर विक्रमी पाऊस पडलाय. एका दिवसात तेलंगाणातील एका ठिकाणी ६०० मिलिमीटर हून अधिक पाऊस झाला आहे. आता ऑगस्टमध्ये पावसाची स्थिती कशी राहील याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
Thane Rain Updates: ठाण्यात धो-धो पाऊस, घोडबंदर रोडवर कंबरेपर्यंत पाणी, मुसळधार पावसाने दैना
भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना ऑगस्टमध्ये पावसाची स्थिती कशी असेल यासंदर्भात अंदाज व्यक्त केला आहे. मान्सूनची स्थिती पाहता ऑगस्ट महिन्यातील काही दिवसांमध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज होसाळीकर यांनी व्यक्त केला.

Rain: कोल्हापूरसाठी पुढील २४ तास महत्त्वाचे; धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत पुन्हा वाढ

राज्यात मुंबई, कोकण, नांदेड, विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग

राज्यात जुलैच्या दुसऱ्या पंधरावड्यात पावसानं जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरु आहे. चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, वाशिममध्ये पावसानं हजेरी लावली. आज नागपूरमध्ये जोरादार पाऊस झाला. मराठवाड्यात देखील नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. नांदेड जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे.

दरम्यान, पुढील तीन ते चार तासांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, पुणे, सातारा , मराठवाड्यासह, पश्चिम विदर्भ, गोवा, उत्तर कर्नाटक, गुजरात आणि राजस्थानमध्ये पुढील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं उद्यासाठी मुंबई, चंद्रपूर आणि गडचिरोलीला रेड अलर्ट जारी केला आहे.
मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here