पुणे: पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) बीएससीच्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेने संपूर्ण पुण्यात एकच खळबळ माजली आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी घडल्याची माहिती आहे. या घटनेची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. हा विद्यार्थी नाशकातील असून तो पुण्यात बीएससीचं शिक्षण घेत होता. त्याने वसतिगृहात आपलं आयुष्य संपवलं आहे.

विष्णू कुंज वसतिगृहात संपवलं जीवन

ओम कापडणे (वय २०) असे जीवन संपवलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. वडारवाडी येथील विष्णू कुंज वसतिगृहात ओमने गुरुवारी गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. ही माहिती मिळताच हेल्परायडर्स संघटनेचे पंकज घरडे आणि अभिजित मेश्राम घटनास्थळी पोहोचले. ओमला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी रुग्णालयात तपासून त्याला मृत घोषित केले.

तरुणीवरील हल्ल्याने पुणे सुन्न! बचावास गेलेले अनेक जण जखमी; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

मुळचा नाशिकचा पुण्यात शिक्षण घेत होता

ओम मुळचा नाशिक येथील असल्याची माहिती आहे. तो पुण्यातील विष्णू कुंज वसतिगृहात राहत होता. तो फर्ग्युसन महाविद्यालयात बीएससीच्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षांत शिकत होता. गुरुवारी सायंकाळी त्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली. ओमने जिथे घळफास घेतला तिथे घटनास्थळी कुठलं पत्र वगैरे आढळून आलेलं नाही. त्यामुळे ओमने हे पाऊल का उचलले याबाबत सध्या काहीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस सध्या या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं असे चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण यांनी सांगितले आहे.

Mumbai-Pune Expressway: १०० कोटींची माती झाली, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली, निकृष्ट जाळ्यांमुळे घात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here