जळगाव : वेगवेगळ्या पद्धतीने सायबर चोरटे शक्कल लढवून फसवणूक करत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला आहे. सायबर चोरट्याने चक्क तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली झाल्याचा फायदा घेत त्यांचे बनावट फेसबुक खाते तयार केले आणि त्याद्वारे घरगुती साहित्य विक्री करावयाचे असल्याचे सांगत फसवणुकीची अनोखी शक्कल लढवली.

तत्कालिन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावरून घरगुती साहित्य विक्री करायचे आहे असे सांगून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तत्कालिन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मास्टरमाइंड पोलीस; गुन्हेगारांचा अचूक छडा लावणारे अजय जाधव यांचा सन्मान होणार

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून अमन मित्तल हे कार्यरत होते. गेल्या दोन दिवसांपुर्वीच त्यांची प्रशासकीय बदली झाली आहे. दरम्यान, अमन मित्तल यांच्या नावाने सायबर चोरट्याने फेसबुकवर बनावट खाते तयार केले. त्यावर स्वत: अमन मित्तल असल्याचे भासवून बदली झाल्यामुळे घरगुती सामान विक्री करावयाचे असल्याचे पोस्ट संबंधिताने फेसबुकवरून टाकली.

बनावट फेसबुक तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून घरगुती साहित्य विक्री केले जात असल्याच्या या पोस्टबाबत अमन मित्तल यांच्या मित्रांनी त्यांना कळविले. त्यानंतर कुणीतरी अज्ञात व्यक्ती फसवणूक करत असल्याची खात्री झाल्यावर तात्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ऑनलाईन पध्दतीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तसेच या प्रकारबाबत फोनवरून जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांना कळविले. संबंधित बनावट फेसबुक खातं व त्यावरून फसवणूक संदर्भातील मेसेजचे फोटो अमन मित्तल यांनी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना व्हॉटसटॲपवरून पाठविले आहेत.

तीन महिन्यापूर्वी लग्न, घरात कुणी नसताना टोकाचा निर्णय; नवविवाहित महिलेचं कुंकू पुसलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here