सातारा : कोरेगाव शहरातील महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यात तब्बल २१ वर्ष फरार असलेला आणि वेश व ओळख बदलून चक्क मेंढपाळ म्हणून गावातच फिरत असलेल्या आरोपीला ताब्यात घेण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरेगाव गावाच्या हद्दीत लक्ष्मीनगर येथे राहत्या घरात १२ फेब्रुवारी २००२ मध्ये मालन बबन बुधावले (वय ३५, रा. एकसळ, ता. कोरेगाव, जि. सातारा) ही महिला मृतावस्थेत आढळून आली होती. तिचा किसन नामदेव जाधव (रा. भुषणगड ता. खटाव) याने खून केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. त्याच्याविरुध्द कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी हा गुन्हा घडल्यापासून अद्यापपर्यंत फरारी होता. तो स्वतःची ओळख मेंढपाळ बनून खटाव व कोरेगाव परिसरात वाड्यावस्त्यावर वावरत होता. त्याचा बऱ्याचदा पोलिसांनी शोध घेऊनही तो मिळून येत नव्हता.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना आरोपी हा भुषणगड (ता. खटाव) येथे मेंढपाळ म्हणून वावरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा भुषणगड (ता. खटाव) येथे शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. नेमलेल्या पथकाने आरोपीस ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोरेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.खून केल्यानंतर मुंबई पुण्यात वास्तव्य
आता पोलिसांपुढं आव्हान
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोरेगाव गावाच्या हद्दीत लक्ष्मीनगर येथे राहत्या घरात १२ फेब्रुवारी २००२ मध्ये मालन बबन बुधावले (वय ३५, रा. एकसळ, ता. कोरेगाव, जि. सातारा) ही महिला मृतावस्थेत आढळून आली होती. तिचा किसन नामदेव जाधव (रा. भुषणगड ता. खटाव) याने खून केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. त्याच्याविरुध्द कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी हा गुन्हा घडल्यापासून अद्यापपर्यंत फरारी होता. तो स्वतःची ओळख मेंढपाळ बनून खटाव व कोरेगाव परिसरात वाड्यावस्त्यावर वावरत होता. त्याचा बऱ्याचदा पोलिसांनी शोध घेऊनही तो मिळून येत नव्हता.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना आरोपी हा भुषणगड (ता. खटाव) येथे मेंढपाळ म्हणून वावरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा भुषणगड (ता. खटाव) येथे शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. नेमलेल्या पथकाने आरोपीस ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोरेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
खून केल्यानंतर मुंबई पुण्यात वास्तव्य
किसन जाधव यानं संबंधित महिलेचा खून केल्यानंतर काही दिवस मुंबई आणि पुण्यात वास्तव्य केलं. दोन्ही शहरांमध्ये राहिल्यानंतर तो सातारा जिल्ह्यात परत आला होता. साताऱ्यात परत आल्यानंतर किसन जाधव यानं शेळ्या आणि मेंढीपालनाचा व्यवसाय सुरु केला होता. काही दिवसांपूर्वी किसन जाधव मूळ गावी आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
आता पोलिसांपुढं आव्हान
सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं २१ वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं असलं तरी आता त्यांच्यापुढं नवं आव्हान उभं राहिलं आहे. २० वर्षापूर्वीचे एफआयआर, पुरावे, पंचनामे यासंदर्भातील कागदपत्रं मिळवण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे.