नवी दिल्ली: बिल्डरच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नवी दिल्लीत घडली आहे. राजधानीच्या डाबरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. बिल्डरच्या घराजवळच त्याच्या पत्नीची हत्या करण्यात आली. त्यांतर आरोपीने स्वत: वरही गोळी झाडून घेतली. मृत महिला आणि आरोपी काही वर्षांपूर्वी एकाच जिममध्ये जायचे आणि दोघांमध्ये मैत्री होती, असे सांगितले जात आहे. मात्र, या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याप्रकरणी पोलिसांनी महिला आणि आरोपीचा मोबाईल जप्त केला आहे. दोघांचे फोन तपासल्यानंतरच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असं सांगितलं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डबरी येथे एका महिलेची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रेणू गोयल (४२ वर्षे) असे महिलेचे नाव आहे. तिच्या घराजवळच तिला गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. रेणूचा नवरा बांधकाम व्यावसायिक आहे, तर ती गृहिणी होती. रेणूला तीन मुले आहेत.

Pune News: फर्ग्युसन कॉलेजमधील बीएससीच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, पुणे हादरलं
माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी आशिष (२३ वर्षे) याची ओळख पटवली. रेणूची हत्या करून तो फरार झाला होता. यानंतर पोलिस आरोपी त्याच्या आई-वडिलांसोबत राहत असलेल्या घरी पोहोचले. पोलिस जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा त्यांना आशिषने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे दिसले. रेणूवर ज्या शस्त्राने गोळी झाडली आणि आशिषने आत्महत्या केली ते शस्त्रही पोलिसांनी जप्त केले आहे.

जिममध्ये मैत्री ते हत्या

आशिष आणि रेणू अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघे काही वर्षांपूर्वी एका जिममध्ये भेटले होते. मात्र, हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या खून प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

प्राथमिक तपासात परस्पर वैमनस्यातून हा प्रकार झाल्याचं समोर येत आहे. मात्र, हत्येमागील कारण तपासानंतरच समजेल. रेणू आणि आशिष यांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांच्या तपासाच्या आधारेच हत्येचे कारण स्पष्ट होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणे आहे. याशिवाय, पोलिसांनी तपासासाठी जवळपासच्या परिसरात लावलेले सर्व सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहेत.

आईचा एक गुरुमंत्र अन् मुलगा क्षणात कोट्यधीश झाला, कहाणी वाचून थक्क व्हाल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here