नवी दिल्ली : जगातील १८० हून अधिक देशांमध्ये पाहायला मिळतंय. भारतासारख्या लोकसंख्या जास्त असलेल्या देशात करोना संक्रमणाचा धोका आणखीनच वाढलेला दिसून येतोय. जगभरात आत्तापर्यंत २.४१ कोटींहून अधिक जण करोना संक्रमणाच्या विळख्यात अडकलेले दिसत आहेत. तर ८.२५ लाखांहून अधिक संक्रमितांना करोना संक्रमणामुळे आपला जीव गमवावा लागलाय. भारतातही करोनाचे आकडे नवनवीन रेकॉर्ड करताना दिसत आहेत. आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी जारी केलेल्या आकड्यांनीही असाच एक नवीन रेकॉर्ड तयार केलाय.

२४ तासांत भारतात कोविडचे नवीन ७५ हजार ७६० नवीन करण्यात आलेत. यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ३३ लाख १० हजार २३४ वर पोहचलीय. देशात अद्याप ७ लाख २५ हजार ९९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

२४ तासांत देशात १०२३ मृत्युची नोंद करण्यात आली. त्यामुळे एकूण मृत्युंची संख्या ६० हजार ४७२ वर पोहचलीय. तर आत्तापर्यंत या आजारावर मात करणाऱ्यांची एकूण संख्या २५ लाख २३ हजार ७७१ वर पोहचलीय.

संबंधित बातम्या :

वाचा :

वाचा :

चाचण्यांची संख्या

आत्तापर्यंत देशात एकूण ३ कोटी ८५ लाख ७६ हजार ५१० सॅम्पलची चाचणी करण्यात आलीय. यातील २६ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ९ लाख २४ हजार ९९८ करोना सॅम्पल्सची चाचणी पार पडली.

गेल्या ११ दिवसांत देशात करोनामुळे १० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. १५ ऑगस्ट दरम्यान मृतांचा आकडा ५० हजारांच्या जवळपास पोहचला होता. तर मृत्युदरात घट होऊन तो १.९ टक्क्यांवर पोहचला होता. परंतु, बुधवारी मृत्युदरात वाढ नोंदवण्यात आली. सध्या मृत्युदर १.८ टक्क्यांवर पोहचलाय.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

देशात अनेक राज्यांत करोना रुग्णांच्या संख्येनं अचानक जोर धरलेला दिसून येतोय. महाराष्ट्रात बुधवारी सर्वाधिक म्हणजेच १४ हजार ८८८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर कर्नाटकात बुधवारी १३३ रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, ओडिशा, हरियाणा आणि उत्तराखंड यांसारख्या राज्यातही करोना संक्रमणाच्या आकडेवारीत वाढ दिसून येतेय.

इतर बातम्या :

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here