वाचा-
विराट सध्या आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी युएईमध्ये आहे. मार्च महिन्यापासून विराट आणि अनुष्का मुंबईत एकत्र आहेत. करोना व्हायरसमुळे ना क्रिकेट सुरू होते ना चित्रपटाचे शुटिंग यामुळे या दोघांनी मोठा कालावधी एकत्र घालवला. आता क्रिकेट पुन्हा सुरू होत आहे. विराट याच आठवड्यात युएईला दाखल झाला. आज या दोघांनी सोशल मीडियावरून गुड न्यूज शेअर केली.
वाचा-
भारतीय क्रिकेट खेळाडूमध्ये या वर्षी सुरेश रैनाला दुसरे बाळ झाले. त्यानंतर हार्दिक पांड्याने विवाह आणि गुड न्यूज एकत्र दिली. काही दिवसांपूर्वी त्याला मुलगा झाला. तर चहल आणि विजय शंकर यांनी आयपीएलला रवाना होण्याआधी साखरपुडा उरकला.
काही दिवसांपूर्वी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी महेंद्र सिंह धोनी सोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या सुरेश रैनाला मार्च महिन्यात मुलगा झाला होता. त्याला २०१६ मध्ये पहिली मुलगी झाली होती.
वर्षाच्या सुरुवातीला हार्दिक पांड्याने फिल्मी स्टाइलने गर्लफ्रेंड नताशा स्टानकोविचसह समुद्रात साखरपुडा केला होता. त्यानंतर लॉकडाउनमध्ये हार्दिक आणि नताशा एकत्र होते. त्यांनी विवाह आणि गुड न्यूज एकाच वेळी सर्वांना सांगितल. या दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही बातमी दिली होती. त्यानंतर हार्दिक आणि नताशा बेबी बंपचे फोटो शेअर करत होते. या दोघांना काही दिवसांपूर्वी मुलगा झाला. त्यानंतर चहल आणि विजय शंकर यांनी आयपीएलला रवाना होण्याआधी साखरपुडा केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times