मुंबई: मनसेने येत्या २३ जानेवारी रोजी महाअधिवेशनाचं आयोजन केलेलं असतानाच शिवसेनेनेही त्याच दिवशी यांच्या सत्काराच्या निमित्ताने जल्लोष मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या जल्लोष मेळाव्याला ५० हजार लोक उपस्थित राहणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शिवेसना आणि मनसेच्या शक्तिप्रदर्शनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

येत्या २३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री यांचा बीकेसी मैदानावर जंगी सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जल्लोष मेळावा असं या मेळाव्याला नाव देण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसविण्याचं वचन उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिलं होतं. ते वचन त्यांना पूर्ण केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील बड्या नेत्यांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्याला ५० हजार लोक येणार असून देशातील राजकीय नेते, उद्योजक आणि सिने कलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार असल्याचं परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी सांगितलं.

२३ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. रात्री १० वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल, असं सांगतानाच हा कार्यक्रम म्हणजे जल्लोष आणि वचनपूर्तीचा सोहळा असेल, असं अनिल परब म्हणाले. हे आयोजित केलेलं शक्तिप्रदर्शन नसेल. शिवसेनेला शक्तिप्रदर्शन करण्याची कधीच गरज भासली नाही. शिवसेनेची शक्ती संपूर्ण देशाला माहीत आहे. उलट लोक या दिवसाची वाट पाहत होते. लाखोच्या संख्येने ते स्वत:हून या सोहळ्याला उपस्थित राहतील, असंही ते म्हणाले. मनसेच्या अधिवेशनाला आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, २३ जानेवारी रोजीत मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेचं महाअधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे काय बोलतात, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या अधिवेशनात राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग केलं जाणार आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here