मुंबई: प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक यांना खंडणीसाठी आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने ही धमकी देण्यात आली असून मांजरेकरांकडून ३५ कोटींची मागणी करण्यात आली आहे.

महेश मांजरेकर यांना व्हॉट्सअॅपवरून गेल्या दोन दिवसांपासून धमकीचे मेसेज येत होते. त्यांना ३५ कोटी रुपये खंडणी देण्याची मागणी केली जात होती. अंडरवर्ल्ड डॉन याच्या नावाने ही धमकी दिली जात असल्याने मांजरेकर यांनी काल खंडणीविरोधी पथकाकडे जाऊन तक्रार नोंदवली. यावेळी खंडणीविरोधी पथकाला सर्व मेसेज दाखवून धमकी येत असलेल्या मोबाइलचा नंबरही देण्यात आला. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने तात्काळ कार्यवाही करत रत्नागिरीतून एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचा अबू सालेमशी काही संबंध आहे का?, धमकी देण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here