अमरावती : जिल्हा परिषद शाळांची अवस्था सध्या विद्यार्थ्यांविना अत्यंत बिकट झाली आहे. विद्यार्थी झेडपीच्या शाळांकडे न वळण्याच्या अनेक कारणांपैकी गुरुजींचं वर्तन हेसुद्धा एक कारण असल्याचं बोललं जात आहे. तालुक्यातील घोगर्डा येथील शाळेतील शिक्षक चक्क टेबलवर झोपून फोनवर बोलत असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

सविस्तर वृत्त असे की, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोगर्डा या छोट्याशा गावात जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ४ पर्यंतची शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या १० असून, ही सर्व मुले काबाडकष्ट करुन पोट भरणाऱ्या आणि तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवण्याची आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या दाम्पत्यांची आहेत.

सर्पदंशानंतर चार रुग्णालयांचे उंबरे झिजवले, १२ वर्षीय बालिकेचा तडफडून मृत्यू
शाळेत दोन शिक्षक असून त्यातील एक शिक्षिका रजेवर असताना दुसरे शिक्षक विलास पुसाम २७ जुलै रोजी वर्गाच्या खोलीतील एका टेबलवर चक्क झोपून फोन करत असल्याचा व्हिडिओ एका गावकऱ्याने काढला. हा व्हिडिओ काढणारी व्यक्ती गुरुजींना ‘ओ साहेब’ म्हणून आवाजही देते, परंतु गुरुजी फोनवर बोलण्यात एवढे गुंतलेले दिसतात, की शेवटी व्हिडिओ काढणारी व्यक्ती जवळ जाऊन आवाज देतो.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघातात पतीचा मृत्यू, पाच वर्षांनी पत्नीला दीड कोटींची भरपाई
हा व्हिडिओ संबंधित व्यक्तीने गावातील सोशल मीडियावर व्हायरल केला. पाहता पाहता तो गटविकास अधिकारी ते गट शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. परंतु शिक्षकाच्या या गैरवर्तनाचा प्रकार शिक्षण विभागातून तंबी देण्याच्या नावाखाली दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा आहे.

शाळेच्या फी-वाढीचा मुद्दा, भाजप आमदाराला थेट शाळेच्या उपमुख्याध्यापिकांनीच दम भरला

अशा शिक्षकांमुळेच जिल्हा परिषद शाळेत आपल्या पाल्याला पाठवण्यासाठी पालक धजावत नाहीत, अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे. या शिक्षकाची चर्चा गटविकास अधिकाऱ्यांपर्यंत गेल्यावर प्रकरणाची सारवासारव करण्यासाठी गुरुजींनी गावातील काही गावकऱ्यांना पंचायत समितीत आणल्याचीही चर्चा आहे.

लहान बहिणीचं मोठं मन, कोट्यवधींची संपत्तीही पडेल फिकी; भावासाठी आयुष्यभर पुरणारं दान
या संदर्भात गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांच्याशी संपर्क केला असता गट शिक्षणाधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी आदेशित केल्याचे सांगितले. तर प्रभारी गटशिक्षणाधिकारी चिखलदरा येथे असल्यामुळे त्यांचा फोन लागू शकला नाही.

पाहा व्हिडिओ :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here