सातारा : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्याच्या मुलीचं अपघाती निधन झालंय. फेसबुक पोस्ट करुन त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. सहकारी मित्राच्या लेकीच्या मृत्यूची बातमी कळताच मनाला प्रचंड वेदना झाल्याचं सांगत अहेरराव कुटुंबाला दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना उदयनराजेंनी केली आहे.

उदयनराजे भोसले यांचे मित्र दीपक आहेरराव यांचं काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अहेरराव यांच्या पत्नी ज्योती आहेरराव यांनी कुटुंबाचा गाडा हाकला. अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी आपल्या लेकरांना शिकवलं. पण नियतीच्या क्रूर खेळासमोर शेवटी त्यांना हात टेकावेच लागले. नुकतीच नगर पालिकेत सेवेस लागलेल्या मुलीच्या अपघाती निधनाने अहेरराव कुटुंबानर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

उदयनराजे भोसलेंची इमोशनल पोस्ट

आमचे निकटवर्तीय मित्र कै दीपक आहेरराव यांची सुकन्या कु. गायत्री दिपक आहेरराव हिचा काल दुर्देवी अपघातात मृत्यु झाला. हे समजल्यानंतर मनाला प्रचंड वेदना झाल्या. भूतकाळातील अनेक घटना वेगाने तरळून गेल्या. श्री आहेरराव परिवाराशी आमचा अत्यंत घनिष्ट ऋणानुबंध आहे.

कै. दीपक यांचेही काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते आणि आज परत हा दुःखाचा डोंगर आहेरराव कुटुंबियांवर आला वहीनी श्रीमती ज्योती आहेरराव यांनी अतिशय कष्टांने व जिद्दीने सर्व अडचणींना सामोरे जाऊन मुलांची शिक्षण व सर्व गोष्टींची पूर्तता केली आज त्यांच्यासाठी काय भावना व्यक्त कराव्यात हेच समजत नाही आम्ही निशब्द आहोत.

वडिलांचं अपघाती निधन, आता लेकही तशीच गेली; यवतेश्वर घाटात दोन कार समोरासमोर धडकून भीषण अपघात
नुकतीच नगरपरिषदेच्या सेवेत गायत्री रुजू झाली होती, याचे समाधान होते. परंतु हे समाधान अल्पकालावधीचे ठरले. तिच्या अचानक एक्झीटची सल मनात कायम टोचत राहील. आहेरराव कुटुंबाच्या दुखात आम्ही सहभागी आहोत. कुटुंबियांना व मित्रपरिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. गायत्रीच्या आत्म्यास चिरशांती लाभो…


यवतेश्वर घाटात अपघात

सातारा शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाट परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये चार ते पाचजण जखमी झाले आहेत, तर गायत्री आहेरराव (वय २१) हिचा मृत्यू झाला आहे. जखमींना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मी अजितदादांना फोन केला होता, सध्या ते धावपळीत, लवकरच भेटून शुभेच्छा देईन : उदयनराजे भोसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here