घरातील कर्ता आधार गेल्यानंतर स्वत: उचलली जबाबदारी

वरुण भावंडांमध्ये सर्वात मोठे आहेत. वडिलांचं सायकल रिपेअरिंगचं दुकान हे त्यांच्या घरातील उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत होता. वडील गेल्यानंतर वरुण यांनी दुकानाची जबाबदारी घेतली आणि तिथेच काम करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातील बोईसर शहरात लहानाचे मोठे झालेले वरुण बरनवाल यांनी १०वीच्या परीक्षेत त्यांच्या वर्गात पहिला क्रमांक पटकावला.
आईने कठीण परिस्थितीतही शिक्षण सुरू ठेवण्याचं सांगितलं

ज्यावेळी वरुण यांच्या आईने त्यांची शिक्षणाची आवड आणि आयुष्यात काही करुन दाखवण्याची इच्छा पाहिली त्यावेळी त्यांच्या आईने सायकलच्या दुकानाची जबाबदारी स्वत:कडे घेतली. त्यांच्या आईने त्यांना पुढील शिक्षण चालू ठेवण्याचं सांगितलं. वरुण यांना ज्यावेळी कोणतीही समस्या आली, त्यावेळी त्यांच्यापुढे एक व्यक्ती असा होता, ज्यांनी त्यांना अतिशय सपोर्ट केला.
इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं

त्यांना नेहमी मदत करणाऱ्यांपैकी एक वरुण यांच्या वडिलांचे मित्र डॉ.कंपली होते. डॉ. कंपली यांनी वरुण यांच्या वडिलांच्या मृत्यूआधी त्यांच्यावर उपचार केले होते. डॉ. कंपली यांनी वरुण यांना कॉलेजच्या सुरुवातीच्या फीपासून ते आयएएसच्या शिक्षणातदेखील मदत केली. शालेय शिक्षण झाल्यानंतर वरुण यांनी त्यांचं लहानपणीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण फी अधिक असल्याने त्यांनी इंजिनिअरिंगची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळवत शिक्षण पूर्ण केलं

वरुण यांना एमआयटी कॉलेज पुण्यात प्रवेश मिळाला. कॉलेजची स्कॉलरशिप मिळवण्यासाठी त्यांनी इंजिनिअरिंग कोर्सच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये अतिशय मेहनत घेतली. त्यानंतर कॉलेजच्या शिष्यवृत्तीचा वापर करुन त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. वरुण यांच्या मित्रांनीही त्यांना खूप मदत केली. कठीण प्रसंगात त्यांना साथ दिली.
MNC मधील नोकरी सोडून बनले IAS

इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर वरुण यांना एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली. पण वरुण यांना सिव्हिल सर्विसेजमध्ये पुढे जायचं होतं. परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना स्वयंसेवी संस्थांची मदत मिळाली. त्यांनी वरुण यांना पुस्तकं दिली. सर्वांच्या मदतीने त्यांनी परीक्षेत मोठं यश मिळवलं आणि आयएएस अधिकारी झाले. वरुण बरनवाल यांनी २०१६ रोजी यूपीएससी आयएएस परीक्षेत ३२वा क्रमांक मिळवला.