अहमदनगर : कर्जत तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न सध्या राज्यात गाजत आहे. अधिवेशनात आणि अधिवेशनाच्या बाहेरही हा मुद्दा पेटला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यातील श्रेयवाद असल्याचेही आता लपून राहिले नाही. या मुदद्यावर नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही आता भाष्य केले आहे. केवळ एमआयडीसी मंजूर करून काम भागत नाही. तेथे उद्योग येणे आणि ते सुरळीत चालणे आवश्यक असते. त्यासाठी पायाभूत सुविधा आणि तसे वातावरण तेथे आवश्यक असते, असे विखे पाटील म्हणाले आहेत.

कर्जतला नीरव मोदीची जागा खरेदी राम शिंदे यांच्याच काळात, रोहित पवारांचा आरोप

कर्जत आणि जामखेड तालुक्याच्या मध्यावर पाटेगाव येथे एमआयडीसी प्रस्तावित आहे. हा भाग डॉ. विखे पाटील यांच्या लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी यासंबंधी विखे पाटील यांना भूमिका विचारली. त्यावर विखे पाटील म्हणाले, एमआयडीसी त्या भागाच्या विकासासाठी आवश्यक ठरते. मात्र, केवळ मंजुरी मिळाली म्हणजे हे काम होत नाही. राज्य सरकार तेथे जागा आणि सुविधा देते. मात्र, तेथे चांगल्या कंपन्या येण्यासाठी, त्या सुरळीत चालण्यासाठी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागतो. जेथे एमआयडीसी सुरू करायची आहे, तेथे किती आणि कोणत्या कंपन्या येण्यास उत्सुक आहेत, त्यांना येथे अनुकूल वातावरण आहे का? याचा विचारही करावा लागतो. एमआयडीसी मंजूर करतानाच अशी कोणकोणत्या कंपन्यांची तेथे येण्याची इच्छा आहे, कोणाची मागणी आहे याबद्दल लोकांना विश्वास द्यावा लागतो. कंपन्या आल्या नाहीत तर भूखंड रिकामे पडतात. नगर जिल्ह्यात आधीच अशी काही उदाहरणे आहेत. सुपा एमआयडीसी सोडली तर अन्यथा फारसे चांगले वातावरण नाही. सुपा एमआयडीसीतील उद्योजकांनाही अनेक अडचणी येत आहेतच. लोकप्रतिनिधींना उद्योग स्नेही वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अन्यथा कागदावरच्या एमआयडीसीचा काहीही उपयोग होत नाही, असेही विखे पाटील म्हणाले.

श्रेयवादात रखडली दुष्काळग्रस्त कर्जतची एमआयडीसी, बेरोजगार तरुणांची क्रूर थट्टाच

नगर- पुणे रेल्वे सेवा लवकरच

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नगर-पुणे रेल्वे शटल सेवा सुरू करण्याची मागणी लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. यासाठी आवश्यक ती पूर्तता झाली असून लवकरच या मार्गावर विजेवर चालणारी रेल्वे सुरू होणार आहे, अशी माहिती नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपण पाठपुरावा करीत आहोत. नगरकरांचे हे स्वप्न आता नक्की साकार होणार आहे. ही सेवा नेमकी कधीपासून सुरू होईल, हे आताच सांगू शकत नाही. रेल्वे गाडी सुरू करण्याची जबाबदारी माझी आहे, ती मी पूर्ण करतो आहे. आता त्या गाडीला प्रतिसाद देण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. प्रतिसादाअभावी ती गाडी बंद पडू नये, याची काळजी नागरिकांनी घ्वावी, असे आवाहन विखे पाटील यांनी केले आहे.

कर्जत तालुक्यात माझी एकही गुंठा जमीन नाही, असल्यास मी सरेंडर करेन, पवारांचे आरोप राम शिंदेंनी खोडून काढले!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here