कराची: मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाला आहे. पाकिस्तानचे आर्थिक केंद्र समजले जाणारे कराची शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक घरे पाण्याखाली गेले आहे. पाकिस्तानात जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला असून हजारोजण बेघर झाले असल्याची माहिती पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

पावसाचा मोठा फटका कराची शहराला बसला. अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचले होते. त्यामुळे अनेकजणांना घरी पोहचता आले नाही. सर्वाधिक जीवितहानी सिंध प्रांतात झाली असून, तेथे मृतांची संख्या ३१ झाली आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानमध्ये १५, तर पंजाबमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर पाकिस्तानमधील मृतांची संख्या १३ वर पोहोचली असून, पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. या आठवड्यातही कराचीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कराचीत ५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे सखल भागात पाणी साचले असल्याचे हवामान विभाग प्रमुख सरदार सरफराज यांनी सांगितले.

वाचा:

वाचा:

आपत्ती विभागाचे कर्मचारी, पाकिस्तानचे सैन्य आणि विविध संघटनांचे कार्यकर्त्यांकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ग्रामीण भागातील लोकांनी त्यांच्या मोठ्या शहरात राहणाऱ्या नागरिकांकडे आश्रय घेतला आहे. सिंधमधील दादू जिल्ह्यातील ३०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, तर कराचीतील १,२४५ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. मात्र, अद्याप काही नागरिक मदतीची वाट बघत आहेत. हा संपूर्ण आठवडा कराचीत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

वाचा: वाचा:
अफगाणिस्तानमध्ये पुराचे ४५ बळी

अफगाणिस्तानमधील परवान भागात आलेल्या पुरामुळे मरण पावलेल्यांची मृतांची संख्या बुधवारी सकाळपर्यंत ४५ नोंदवण्यात आली. सुमारे ८० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यापैकी पाच जणांची स्थिती गंभीर असून, त्यांना उपचारासाठी काबूल येथे हलवण्यात आले आहे,’ अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. बहुतांश भागात अद्याप बचाव पथके पोहोचली नसल्याची तक्रारी स्थानिक नागरिक करीत आहेत. अध्यक्ष अश्रफ घनी यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाला बचावकार्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here