पुणे: भोर तालुक्यातील वरांधा घाट परिसरात असणाऱ्या नीरा देवघर धरणात चार चाकी कोसळली होती. त्यात आता महत्वाची माहिती समोर आली आहे. वारवांड – शिरगाव हद्दीत असलेल्या वळणावर धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी थेट ३०० फूट खोल दरीत कोसळली. या गाडीत चार जण प्रवास करत होते. त्यातील तिघांना जलसमाधी मिळाली असून एकजण बचावला आहे.
वरंधा घाटात भीषण अपघात, बंदी असताना प्रवास करणं जीवावर बेतलं, कार धरणात कोसळली, तिघे बुडाले
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय रमेश धाडे( २७), स्वप्नील परशुराम शिंदे (२८), तरुणी हर्षप्रीत हरप्रीतसिंग बांबा (३०) यांचा गाडीत अडकल्याने बुडून मृत्यू झाला. तर संकेत विरेश जोशी हा गाडीच्या बाहेर फेकला गेल्याने तो बचावला. हे सर्वजण वरांधा घाट मार्गे कोकणात ट्रेकिंगसाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास भोर तालुक्यातील वरांधा घाट मार्गे हे चौघेजण कोकणात जाण्यासाठी चारचाकी क्र. एमएच १४ एचडी ३९८४ या गाडीने निघाले होते. मात्र सकाळच्या वेळी घाट परिसरात प्रचंड धुके होते. त्यामुळे चालकाला एका वळणाचा धुक्यामुळे अंदाज न आल्याने त्यांची गाडी थेट ३०० फूट खोल धरणाच्या. पात्रात जाऊन बुडाली. त्यातून एकजण गाडीच्या बाहेर फेकला गेला. त्यामुळे तो बचावला.

गडचिरोलीत पावसाचा कहर, अहेरी-मुलचेरा तालुक्याचा दुसऱ्यांदा संपर्क तुटला

मात्र बाकीचे तिघेजण गाडीत अडकल्याने त्यांना वेळीच बाहेर पडता न आल्याने त्यांचा गाडीतच बुडून मृत्यू झाला असून स्वप्नील शिंदे याचा शोध अद्यापही सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच भोईराज जल आपत्ती पथक, सह्याद्री रेस्क्यू फोर्स भोर-पुणे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून शोध कार्य सुरू केले. यात तरुणी हर्षप्रीत बांबा व तरुण अक्षय धाडे यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून एकाचा शोध अद्यापही सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here