वाचा-
अनिल अंबानींच्या विरुद्धच्या कारवाईला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने २०१६ साली यांच्या कम्युनिकेशन आणि रिलायन्स इफ्राटेल या कंपन्यांना हे कर्ज दिले होते. या कर्जासाठी अंबानी यांनी १ हजार २०० कोटी रुपयांची पर्सनल गॅरेन्टी दिली होती. आता या दोन्ही कंपन्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे एसबीआयला मुंबई NCLTकडे अपील करावी केली.
वाचा-
एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले आणि अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ADAG)चे मालक अनिल अंबानी गेल्या काही काळापासून अडचणीत आहेत. SBIने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी NCLT अपील केली होती. या अपीलात नियमानुसार अंबानी यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्याची परवानगी द्यावी कारण त्यांनी पर्सनल गॅरेन्टी दिली होती, अशी मागणी बँकेने केली होती. RCOM आणि RITL या दोन्ही कंपन्यांना जानेवारी २०१७ मध्ये कर्ज देता न आल्याने डिफॉल्ट केले होते. त्याची खाती २६ ऑगस्ट २०१६ रोजी नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून घोषीत केली होती.
२०१९ साली RCOMने सांगितले होत की, त्यांच्यावर ३३ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. तर बँकेच्या मते RCOMवर ४९ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या वर्षी एसबीआय बोर्डाने RCOM एक ऑफर दिली होती. ज्यात ५० टक्के सवलत देत २३ हजार कोटी रुपये देण्यास सांगितले होते.
वाचा-
बँकेचा मुख्यालयावर ताबा
गेल्या महिन्यात खासगी क्षेत्रातील यस बँकेने मुंबईतील अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ADAG)चे मुख्य कार्यालय, रिलायन्स सेंटर स्वत:च्या ताब्यात घेतला होता. मुंबईतील सांताक्रूज येथील २१ हजार वर्ग फूटपेक्षा अधिक जागा असलेले मुख्यालय आणि दक्षिण मुंबईतील नागिन महल या दोन मजली इमारतीचा ताबा बँकेने घेतला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
These are actually great ideas in concerning blogging.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.