सिनेमाचं नाव नोंदवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ लागल्याचं दिसून येतंय. मात्र, या शीर्षकांची नोंदणी करून घेण्यासाठी सुशांतच्या कुटुंबियांची परवानगी असणं आवश्यक असल्याचं सांगत नोंदणी करण्यास नकार दिला जातोय.सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा वाद उफाळून आला. बॉलिवूडमध्ये प्रस्थापित असलेल्या स्टारकिड्सना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
सध्या सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडं असला, तरी सोशल मीडियावर या घटनेवरुन विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. अनेकांनी या घटनेवर आणि सुशांतच्या जीवनातील चढ-उतारांवर चित्रपटाची तयारी सुरू केलीय. हिंदी सिनेसृष्टीतील काही निर्मात्यांनी सुशांतच्या जीवनावर चित्रपट काढण्यासाठी ‘इम्पा’कडे अर्थात, ‘इंडियन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन’कडे चित्रपटाची नावनोंदणी करण्यासाठी अर्ज केले आहेत. सध्या प्रामुख्यानं तीन बड्या निर्मात्यांनी सुशांतच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याचं ठरवलं असून, चित्रपटाची नावनोंदणी करण्यासाठी अर्ज केले आहेत.
पीएसजे मीडियाने ‘सुशांत सिंह राजपूत – द बायोग्राफी’, कनोज मिश्राने ‘सुशांत’ आणि एमएनएन फिल्म्स मीडियानं ‘राजपूत-द ट्रुथ वीन्स’ या नावांसाठी अर्ज केला आहे. काहींनी सुशांतवर बायोपिक वेब सीरिज काढण्याचं देखील ठरवलं असल्याचं समजतंय. आणखी काही सिनेनिर्माते सुशांतच्या जीवनप्रवासावरुन प्रेरणा घेऊन नाव बदलून चित्रपट करण्याचा देखील विचार करत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सीबीआयची टीम सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा कसून तपास करत आहे. सुशांतचा जवळचा मित्र आणि त्याच्या मॅनेजर
याची सीबीआयकडून चार पाच दिवसांपासून चौकशी सुरू असून या चौकशीदरम्यान त्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times