नवी दिल्ली : भारतातून शिक्षण, काम किंवा पर्यटनाच्या उद्देशानं परदेशात जाऊ () इच्छिणाऱ्या नागरिकांना नागरी उड्डाण मंत्रालयाकडून दिलासा देण्यात आलाय. परदेश प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना परवानगीसाठी नागरी विमान मंत्रालयाकडे () अर्ज करण्याची गरज नाही ते थेट विमान कंपन्यांकडून आपली (Ticket Booking) करू शकतात, असं नागरी उड्डाण मंत्रालयाकडून सूचित करण्यात आलंय.

याअगोदर २२ ऑगस्ट रोजी गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रोटोकॉलनुसार, किंवा मंत्रालयाद्वारे नामांकित एजन्सीमध्ये नागरिकांना आवश्यक करावा लागेल. यात प्रस्थान आणि आगमन स्थळाच्या माहितीचाही समावेश होता.

परंतु, ‘वंदे भारत मिशन’ () तसंच ‘एअर ट्राफिक बबल सिस्टम’द्वारे संचालित सर्व विमान कंपन्यांना या उद्देशानं नामांकित करण्यात आलंय, असं नागरी उड्डाण मंत्रालयानं नुकतंच स्पष्ट केलंय. द्विपक्षीय ‘एअर बबल व्यवस्थे’द्वारे दोन्ही देशांची विमानं काही नियमांसहीत विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांना संचालित करू शकतात.

वाचा :

वाचा :

प्रवाशांना आपल्या प्रवासासाठी थेट एअरलाईन्सशी तिकीट बुक करण्यासाठी संपर्क करावा लागेल. त्यांना नागरी उड्डाण मंत्रालयाकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असंही स्पष्ट करण्यात आलंय.

देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २३ मार्चपासून निर्धारीत आंतरराष्ट्रीय उड्डाणं थांबवण्यात आली होती. या दरम्यान ‘वंदे भारत मिशन’ (Vande Bharat Mission)आणि द्विपक्षीय ‘एअर बबल व्यवस्थे’द्वारे () विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू आहेत. भारतानं याच वर्षी जुलैपासून आत्तापर्यंत अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, संयुक्त अरब आमिरात तसंच कतार यांसारख्या देशांसोबत वेगवेगळ्या द्विपक्षीय एअर बबल व्यवस्थेवर करार केले आहेत.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here