मुंबई : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे आयोजित ६ ऐतिहासिक ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे तीन नेते पहिल्यांदाच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी असून आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात कदाचित काही होईल आणि याच्यामध्ये वेगळं सांगायची गरज नाही, असंही शरद पवार म्हणाले. राज्याच्या राजकारणातील शरद पवार यांचं वक्तव्य हे महत्त्वाचं मानलं जात आहे.
शरद पवार काय म्हणाले?
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे या सारख्या संस्थांना आपल्याकडून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सध्याच्या राजकीय स्थितीत आपल्याला सरकारशी बोलणं अडचणीचं जात आहे.सध्याच्या स्थितीतून आज किंवा उद्या काही तरी मार्ग निघतील आणि जेव्हा हे घडलं त्यावेळी सरकारला मदत करायला भाग पाडणं अडचणीचं ठरणार नाही, असंही शरद पवार म्हणाले. Crime Diary : ३ मिनिटं ३३ चोर अन् २ अब्ज ७० कोटींचे हिरे गायब, एअरपोर्टवर थरार; घटना वाचून हादराल उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मी इथं असून आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात कदाचित काहीही होऊ शकतं असं म्हणत शरद पवार यांनी सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर सूचक भाष्य केलं असल्याची चर्चा रंगली. ITR भरण्यासाठी शेवटचा १ दिवस बाकी, आयकर विभागाने केली ही मोठी घोषणा, तयार ठेवा ही महत्त्वाची कागदपत्रे उद्धव ठाकरे ज्या काळात मुख्यमंत्री होते त्या काळात देखील आम्ही त्यांच्या सरकारकडून दोन कामं करुन घेतली होती. संस्थांना मदत करण्याची गरज त्या सरकारच्या काळात पूर्ण केली होती तशीच मदत आज होण्याची गरज असल्याचं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे ही संस्था चांगलं काम करत असून या संस्थेचं काम सुरु ठेवलं पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले.