मुंबई: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वयाची सत्तरी गाठली आहे. इतर नेते ज्येष्ठ आहेत. प्रियांका गांधी या पूर्णवेळ राजकारण करताना दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहुल गांधींशिवाय आहे कोण? राहुल गांधींशिवाय काँग्रेसला पर्याय नाही, असं नेते खासदार यांनी सांगितलं.

खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधीच योग्य असल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेसमध्ये राहुल गांधींशिवाय दुसरं कोण आहे. सोनिया गांधी यांनी वयाची सत्तरी गाठली आहे. प्रियांका गांधी या पूर्णवेळ राजकारण करताना दिसत नाहीत. ज्येष्ठ नेत्यांनी आता मार्गदर्शक मंडळात जायला हवं, असं सांगतानाच ज्यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण काम करतील असे राहुल गांधीच काँग्रेसमध्ये एकमेव आहेत, असं राऊत म्हणाले.

देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. गावागावात पोहोचलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. काँग्रेसला स्वातंत्र्याची पार्श्वभूमी आहे. देशातील सर्वात जुना पक्ष आहे. काँग्रेसला मोठी परंपरा आहे. काँग्रेसने सर्वाधिक पंतप्रधान या देशाला दिले आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत बाबींवर मी बोलणं योग्य नाही. पण काँग्रेसने या वादळातून सावरायला हवं. त्यांनी ग्रासरूटला काम करायला हवं, असंही ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत. पण त्यांनाही निवडून येण्यासाठी राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागली. राजकारणात असं करावंच लागतं, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी निधी वाटपावरून सुरू असलेल्या धुसफूशीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना-भाजपचं सरकार असतानाही विषम पद्धतीने निधी वाटप केला जायचा. भाजपच्या खासदारांना सर्वाधिक निधी दिला जात असल्याची तेव्हाही तक्रार होती. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये असा काही प्रकार असेल तर त्यावर मार्ग निघेल. शेवटी आघाडी म्हणून सर्वांना पुढे जावंच लागेल, असं सांगताना आजही केंद्र सरकारनेही खासदारांचा निधी गोठवला आहे. भाजप खासदारांना सर्वाधिक निधी मिळतो अशा खासदारांच्या तक्रारी आहेत, असंही ते म्हणाले.

राज्यातील आघाडी सरकारमध्ये उत्तम समन्वय आहे. आता जी समन्वय समिती आहे ती मंत्रिमंडळातील कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठीची आहे. आघाडीसाठीही समन्वय समिती असावी असा सुरुवातीला एक विचार आला होता. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची काही गरज नसल्याचं स्पष्ट केलं होतं, असंही ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here