एक व्यक्ती काही ट्विट करत असतो आणि काही वर्षांनी त्या गोष्टी समोर येत असल्याचे आता समोर येत आहे. चाहत्यांनीही सोशल मीडियावर या गोष्टीला दुजोरा दिल्याचे पाहायला मिळत आहे. कोहली आणि अनुष्का यांच्या आयुष्यात जानेवारी महिन्यात आनंदाची बातमी येणार आहे. पण याबाबतचे एक ट्विट काही वर्षांपूर्वीच केल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
कोहली आणि अनुष्का यांच्या गूड न्यूजबाबतचे जे ट्विट व्हायरल झाले आहे त्यामध्ये ५ जानेवारी अशी तारीख देण्यात आली आहे. हे ट्विट २०१५ साली केल्याचे पाहायला मिळत आहे. हे ट्विट कोणी केले आहे, याची उत्सुकता आता तुम्हाला असेल. तर हे ट्विट इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने केल्याचे पाहायला मिळत आहे. आर्चर जे ट्विट करतो ते काही वर्षांनी खरे होते, असे चाहते म्हणत आहेत. काही दिवसांपूर्वी आर्चरचे सुशांतसिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्याबाबतचे एक ट्विटही व्हायरल झाले होते. यामध्ये आर्चरने रियाचे नाव घेतले होते आणि त्याचबरोबर दुसऱ्या शब्दांत फास याबाबतचा उल्लेख होता.
विराट सध्या आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी युएईमध्ये आहे. मार्च महिन्यापासून विराट आणि अनुष्का मुंबईत एकत्र आहेत. करोना व्हायरसमुळे ना क्रिकेट सुरू होते ना चित्रपटाचे शुटिंग यामुळे या दोघांनी मोठा कालावधी एकत्र घालवला. आता क्रिकेट पुन्हा सुरू होत आहे. विराट याच आठवड्यात युएईला दाखल झाला. आज या दोघांनी सोशल मीडियावरून गुड न्यूज शेअर केली. गेल्या काही दिवसात भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी गुड न्यूज दिल्या आहे. यामध्ये सुरेश रैना, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल आणि विजय शंकर यांचा समावेश होता. आता विराटने देखील अशीच गुड न्यूज दिली.
आर्चरचे ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत असून आता चाहत्यांनी त्याला ज्योतिषी बनवले आहे. आर्चर जे काही म्हणतो ते खरे होते, अशी चाहत्यांची धारणा झालेली आहे. चाहत्यांना सोशल मीडियावर आर्चरबाबत काही ट्विटही केलेली पाहायला मिळत आहेत. खरंतर आर्चरचे ट्विट आणि या घटनांचा काहीही संबंध नाही, पण चाहते त्याचा संबंध लावत असल्याचे आता समोर येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks so much for the blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.