नवी दिल्ली: सोशल मीडिया ट्विटरवर केव्हा, काय ट्रेंड करेल याचा अंदाज बांधणे तसे कठीणच… आता हेच पाहा ना, २६/११ च्या मुंबईवरील दहशतवागी हल्ल्यात अटक करून नंतर फासावर चढवण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी आमिर अजमल संध्या अचानक ट्रेंडिंगमध्ये आला आहे. तुम्ही देखील विचार कराल, की कसाब ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी आज असे काही निमित्त नाही. खरेतर, #kasab च्या ट्रेंडिंगमागे बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे एक ट्विट आहे. स्वरा भास्करने अभिनेता सुशांससिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीची तुलना कसाबशी करण्यात आली आहे.

स्वराने खरं तर मीडियावर आपला राग काढला. ज्या प्रकारे मीडिया रिया चक्रवर्तीच्या मागे पडला आहे, ते पाहता मला वाटत नाही की अशा प्रकारे कसाबची देखील मीडिया ट्रायल झाली असेल, असे स्वरा म्हणाली. रियाची तुलना कसाबशी केली गेल्यामुळे ट्विटर युजर्सनी प्रश्न उपस्थित करणे सुरू केली. पाहुया #kasab वर लोक काय म्हणातायत…

@itsanintrovert ने स्वरा के स्टाइलमध्येच लिहिले, ‘हा, आम्ही अशा समाजात जगतोय ज्या समाजात कसाबला दहशतवादी म्हणायला देखील लोक मागेपुढे पाहत आहेत, याची आम्हाला लाज वाटते.’

ट्विटर हँडल @prankya ने लिहिले, ‘विचार करा, आम्ही या प्रकरणाचा आधारच गमावला आहे.देशातील मीडियाने देशातील लाखो लोकांचा आवाज उठवला आणि यामुळे मला देशातील मीडियाचा अभिमान वाटतो. खोटा प्रचार उघड करून अंधारात लपलेले सत्य उजेडात आणले. तुझ्याबद्दल तर मला काही माहिती नाही, मात्र मला मीडियाचा अभिमान वाटतो. कारण मीडिया दररोज काही ना काही नवे सत्य उघड करत आहे.’

@Devansh1012 ने लिहिले, ‘महेश भट्ट, दिग्विजय सिंहांसह अनेक लोकांनी २६/११ हल्ल्यावर पुस्तके प्रकाशित केली. त्यावेळी लेखकांनी थेट आयएसआयवर आरोप केले आणि तीच संस्था या हल्ल्याला जबाबदार असल्याचे म्हटले. त्यांनी या प्रकरणाशी संबधित असलेल्या राहुल भट्टला (महेश भट्ट यांचा पुत्र) वाचवण्यासाठी असे केले.’

क्लिक करा आणि वाचा-

ट्विटर हैंडल @ashwinnagar ने तर स्वराचे ट्विट रिट्विट करत लिहिले की, ‘असे या मुळे, कारण भारतविरोधी लोक या हल्ल्यासाठी RSS ला जबाबदार धरू पाहत होते. त्या लोकांनी त्यावर पुस्तक प्रकाशित केले. तुकाराम यांनी( मुंबई पोलिसातील पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे) कसाबला पकडले म्हणून संपूर्ण गँगवरील पडदा दूर झाला.’

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here