नवी दिल्ली : दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराचा पट जनतेसमोर मांडला होता. १ जुलै २०१७ रोजी देशात जीएसटी लागू करण्यात आला. तेव्हापासून जीएसटी करदात्यांच्या संख्या दुप्पट झाली आहे. तर जवळपास २०० वस्तू आणि सेवांचे कर या दरम्यान झालेल्या बैठकांमध्ये कमी करण्यात आले, असे सरकारने म्हटले होते.

– जीएसटी कौन्सिलची बैठक लांबल्यामुळे तीन वाजता सुरु होणाऱ्या पत्रकार परिषदेला उशीर होणार असल्याचे सरकारने म्हटलं आहे.

– राज्यांना जीएसटीतून अधिक वाटा हवा आहे. राज्यांनी त्यांची महसुली तूट भरून काढण्यासाठी बाहेरून स्वतंत्रपणे रक्कम उचलावी, असा सल्ला केंद्र देण्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र असे केल्यास या रकमेसाठी केंद्राने हमीदार व्हावे, असा आग्रह राज्ये धरतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here