नोएडा : पाकिस्तानातून चार मुलांसह भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत आत आणखी एक चर्चा सुरू झाली आहे. सीमा हैदर ५ महिन्यांची गर्भवती असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. ती ५ व्या अपत्याची आई होणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. खरंतर, सीमा हिला पहिला पती गुलाम हैदरपासून ३ मुली आणि एक मुलगा आहे. या वर्षी मार्चमध्ये तिने नेपाळमधील ग्रेटर नोएडा येथील सचिन मीनासोबत लग्न केलं. आता ती सचिनच्या मुलाची आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी सचिन सीमाला मेडिकल चेकअपसाठी रुग्णालयात घेऊन गेला होता. पण महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या माहितीची पुष्टी करत नाही.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वर्षी मे महिन्यात ग्रेटर नोएडातील रबुपुरा गावात पोहोचलेली सीमा हैदर सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी यूपी एटीएसने सीमा, सचिन आणि नेत्रपाल मीणा यांची चौकशी पूर्ण केली होती. नेत्रपाल हे सीमाचे सासरे आहेत. या तिघांचीही अनेक तास चौकशी केल्यानंतर सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असल्याबाबत काहीही तथ्य आढळून आले नाही. चौकशी झाल्यापासून सीमासह संपूर्ण कुटुंब एकप्रकारे नजरकैदेत आहे.

Success Story: ४५ दिवसांत ४ कोटींची कमाई, महागड्या टोमॅटोने केलं मालामाल, वाचा यशोगाथा…
अशात कुटुंबातील कोणत्याही सदस्याला घराबाहेर पडण्याची परवानगी नसून एक दिवस आधी नेत्रपाल मीणा यांनी मीडियासमोर आपली व्यथा मांडली होती. ते म्हणाले की रोजची भाकरी कमावणारे ते लोक आहेत. आता त्यांच्या घरातील रेशनही संपत आहे. लवकरच उपाशी राहण्याची वेळ येईल.

सीमाने पहिले पती गुलाम हैदरवर केले अनेक आरोप…

सीमा हैदर भारतात आल्यानंतर तिचा पहिला पती गुलाम हैदरचा व्हिडिओही समोर आला आहे. गुलाम यांनी सीमा यांना त्यांची मुले परत करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे गुलाम फक्त नाटक करत असल्याचं सीमाने म्हटलं आहे. त्याचं मुलांवर प्रेम नाही. २०१९ पासून तो आमच्यापासून दूर होता. दुबईत काम करत असताना सीमा आणि मुलांसाठी दर महिन्याला पैसे पाठवायचा, असा गुलामचा दावा आहे. सीमाने तिला राहण्यासाठी दिलेले घर विकले. सीमा सांगते की, घर गुलामचे नसून तिचे होते.

Maharashtra Weather Forecast : राज्यात पावसाचा ब्रेक, पुण्यासह ६ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट तर कुठे विश्रांती? वाचा वेदर रिपोर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here