सैफने नुकताच त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. या आत्मचरित्रात सैफने त्याचे अनुभव, कौटुंबिक आणि करिअरमधील चढ- उतार याबद्दल सांगितले आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या पुस्तकात सैफच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग दिसेल. अनेक मुद्द्यांवर तो परखडपणे भाष्यही करताना दिसेल. तसेच अनेक अनुभव सांगताना त्याला विनोदाची फोडणीही या पुस्तकात असेल.
आत्मचरित्राबद्दल बोलताना सैफ म्हणाला की, इतक्या गोष्टी बदलल्या आहेत की जर त्या नोंदवून ठेवल्या नाहीत तर काळासोबत निघून जातील. भूतकाळात जाणं मजेशीर असेल. आठवणं आणि रेकॉर्ड करणं हा अनुभवही आनंददायी होता. मी आशा करतो की इतरांमाही हे पुस्तक तेवढंच आवडेल.
सैफचंपहिलं लग्न अमृता सिंगसोबत झालं होतं. पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान ही दोन मुलं आहेत. सैफ दिग्गज क्रिकेटपटू नवाब मन्सूर अली खान पतौडी आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा आहे. सैफला सोहा आणि सबा अली खान या दोन बहिणी आहेत.
काही दिवसांपूर्वी सैफ अली खान आणि करिना कपूरने त्यांच्या दुसऱ्या बाळाची घोषणा केली होती. करीना गरोदर आहे. सैफ आणि करिनाने २०१२ मध्ये करीनाशी लग्न केलं. २०१६ मध्ये दोघांना पहिला मुलगा झाला. आजही सोशल मीडियावर तैमूरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तैमूर या नावामुळेही सैफला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. आता सैफने त्याच्या आत्मचरित्राची घोषणा करताच त्याला पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times