औरंगाबाद: मुख्यमंत्री यांना प्लास्टिकच्या आवरणात पुष्पगुच्छ देणं दोन शिवसैनिकांना चांगलच भोवलं आहे. मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी प्लास्टिकच्या आवरणात पुष्पगुच्छ आणल्यामुळे महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना तात्काळ दंड ठोठावला. मुख्यमंत्री थांबलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये आयुक्तांनी ही कारवाई केली.

आस्तिक कुमार पाण्डेय यांनी महापालिका आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारल्यापासूनच प्लास्टिक विरोधी कारवाई सुरु केली आहे. पाण्डेय आयुक्त म्हणून रुजू झाले त्या दिवशी पालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक आर.एम. महाजन यांनी त्यांच्या स्वागतासाठी प्लास्टिकच्या आवरणात पुष्पगुच्छ आणला होता. आयुक्तांनी तात्काळ महाजन यांना पाच हजारांचा दंड ठोठावला होता. पाण्डेय यांच्या स्वागतासाठी भाजपच्या नगरसेविका मनिषा मुंडे यांनी पेन आणला होता. पेन गिफ्ट पेपरमध्ये गुंडाळून आणला होता, गिफ्ट पेपरला प्लास्टिकचे आवरण होते, ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी मुंडे यांना देखील दंड ठोठावला होता.

शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी रामा हॉटेलमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. लातूर येथील पदाधिकारी रामेश्वर पाटील आणि जालना येथील पदाधिकारी मनीष श्रीवास्तव यांची प्लास्टिकच्या आवरणात पुष्पगुच्छ आणला होता. आयुक्तांच्या ही बाब लक्षात आली, त्यांनी सोबतच्या अधिकाऱ्यांना आदेश देत त्या दोघांना दंड आकारण्याचे सांगितले. आयुक्तांच्या आदेशानुसार त्या दोघांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करुन त्याचा पावत्या देण्यात आल्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here