काबूल: अफगाणिस्तानमधील पहिली महिला चित्रपट दिग्दर्शक (Afghanistan’s first female film director) सबा सहर () यांच्यावर काबूल येथील राहत्या घराजवळ चार अज्ञातांनी गोळीबार केला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. या हल्ल्यामुळे खळबळ माजली आहे. या गोळीबाराची अद्याप कोणीही जबाबदारी स्विकारली नाही.

सहर यांचे पती इमाल झाकी यांनी सांगितले की, सबा घरातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांच्या आत गोळीबाराचा आवाज आला. त्यावेळी सबाने फोन करून आपल्यावर गोळीबार झाला असल्याची माहिती दिली. तातडीने मी घटनास्थळी दाखल झालो. त्यावेळी सबा आणि तिचे अंगरक्षक जखमी अवस्थेत आढळले असल्याची माहिती त्यांनी दिली. सबावर तातडीने प्रथमोपचार करत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली.

सबा यांच्यासोबत त्यांच्या कारमध्ये त्यांचे दोन अंगरक्षक, चालक आणि एक लहान मुल होते. अंगरक्षकही या अंदाधुंद गोळीबारात जखमी झाले. तर कारचा चालक लहान मुलाला घेऊन सुरक्षितस्थळी गेला. सहर साबांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या पतीने दिली.

वाचा:

वाचा: या हल्ल्याचा विविध मानवाधिकार संघटनांनी निषेध केला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानवाधिकार संघटनांचा समावेश आहे. असा गोळीबार होणे ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तर, हा आपण केला नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. या हल्ल्यामागे तालिबानचा हात असल्याची चर्चा होती.

वाचा:

सबा सहर या अफगाणिस्तानमधील प्रख्यात अभिनेत्री असून दिग्दर्शक आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. न्याय, भ्रष्टाचार या विषयावर त्यांनी टीव्ही शो, चित्रपटातून सातत्याने मांडणी केली आहे. अफगाणिस्तानमधील महिलांच्या अधिकारांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here