नगर: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्लीच्या प्रकरणात देश आणि परदेशातील तबलिघींविरोधातील एफआरआय रद्द करण्याचा आदेश नुकताच दिला. काळात जमातीला ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आल्याचे निरीक्षणही कोर्टाने यावेळी नोंदवले आहे. आता याचा आधार घेत पक्षाने तबलिघी जमातची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. ( writes letter to Chief Minister Uddhav Thackeray )

वाचा:

करोनाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा हे गुन्हे दाखल झाले, त्यावेळी प्रशासनाने तबलिघी जमातच्या लोकांची शोध मोहीम सुरू केली होती. नगर शहरात महापालिकेने ध्वनिक्षेपक असलेली वाहने फिरवून यासंबंधीची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यातून बदनामी झाल्याचा आणि उच्च न्यायालयाच्या निकालानंतर हे स्पष्ट झाल्याचा दावा एमआयएमने केला आहे. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. ज्यांच्या आदेशाने ध्वनिक्षेपकावर हा बदनामीकारक प्रचार केला जात होता, त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

वाचा:

अशरफी यांनी पत्रात म्हटले आहे, ‘मार्च महिन्यात काही तबलिघी जमातचे भारतीय व विदेशी नागरिक धर्म प्रसार करण्यासाठी धार्मिक स्थळात जात होते. तेव्हा अचानक लॉकडाऊन झाला. अहमदनगर शहरातही धर्म प्रसार करण्यासाठी आलेले लोक येथेच अडकून पडले. त्यातील काहींना करोनाची लागण झाल्याचे नंतर आढळून आले. याचे भांडवल करून त्यांना टार्गेट करण्यास सुरवात झाली. ते येथे कसे अडकले याची खातरजमा न करता गुन्हे दाखल झाले. शिवाय ते लपून बसल्याचा आरोप करण्यात आला. प्रशासनाने ध्वनिक्षेपक लावून नागरिकांना दररोज ही माहिती देण्यास सुरवात केली. दुसरीकडे प्रसार माध्यमांतून यासंबंधीच्या बातम्या देताना दिल्ली मरकझला टार्गेट केल्याने पूर्ण भारतात मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाकडे बघण्याचा दुष्टिकोन बदलला. अहमदनगर महानगपालिकेने दिल्ली मरकझ, तबलिघी जमात, हजरत निजामुद्दीन यांच्या विरोधात ध्वनिक्षेपक लाऊन पूर्ण महापालिका क्षेत्रात असे वातावरण निर्माण केले की जसे करोना या देशात त्यांच्यामुळेच आला. आता उच्च न्यायालयाने निर्णय दिला की यांना बळीचा बकरा करण्यात आला आहे. त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेने पुन्हा ध्वनिक्षेपक लावून तबलिघी जमात व मुस्लिम समाजाची जाहीर माफी मागावी, ज्या अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे हा अपप्रचार केला गेला, त्यांनाही द्वेष पसरविल्याबद्दल दोषी धरून कारवाई करावी, अशी मागणी अशरफी यांनी केली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here