नवी दिल्ली: संध्या देशात करोना आणि करोनावरील हे मु्द्दे मोठ्या प्रमाणावर चर्चीले जात आहेत. करोनावरील लस केव्हा येणार याकडे सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले आहे. या परिस्थितीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष () यांनी करोनाचा (Coronavirus) वाढता संसर्ग, भारत-चीन वादावरील अनेक मु्द्द्यांवर केंद्र सरकारवर सतत हल्लाबोल करत आहेत. Covid-19 च्या लशीवरून आज राहुल गांधी यांनी एक ट्विट करत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. करोना लशीबाबत केंद्र सरकारकडे आतापर्यंत कोणतीही रणनीती नाही. सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘करोनावर लस तयार करण्याबाबत एक निष्पक्ष आणि समावेशक रणनीती आतापर्यंत असायला पाहिजे होती. मात्र आताही त्याबाबत कोणतेही संकेत नाहीत. भारत सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक आहे.’ खरे तर, राहुल गांधी यांनी आपल्या १४ ऑगस्टच्या एका ट्विटला रिट्विट करत हे लिहिले आहे.

त्या ट्विटमध्ये राहुल गांधींनी लिहिले की, ‘भारत कोविड -१९ वरील लस उत्पादक देशांपैकी एक असेल. उपलब्धता, परवडणारी आणि योग्य वितरणव्यवस्था तयार करण्यासाठी स्पष्टपणे परिभाषित, सर्वसमावेशक आणि न्याय्य लस तयार करण्याची रणनीती आवश्यक आहे. भारत सरकारने आता हे करायला हवे.

क्लिक करा आणि वाचा-

जगभरातील अनेक देश कोरोनावरील लस तयार करण्यात व्यग्र आहेत. रशियाने ही लस बनवल्याचा दावा केला आहे. दरम्यान, भारतात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढून ३३,१०,२३४ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७५,७६० नवीन रुग्ण आढळले आहेत. यावेळी १,०२३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २५,२३,७७१ रूग्ण बरे झाले आहेत आणि ६०,४७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ७६.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, सकारात्मकतेचा दर ८.१९ टक्के इतका आहे.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here