कल्पेश गोरडे, प्रदिप भणगे, ठाणे : ठाणे शहरातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना एक भीषण दुर्घटना घडली आहे. क्रेन पडल्याने त्याखाली दबून तब्बल १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून, सदर घटनेत ३ व्यक्ती जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे

१. अरविंद कुमार उपाध्याय (वय ३३, रा.उत्तरप्रदेश)

२. गणेश रॉय (वय ४३, रा. वेस्ट बंगाल)

३. ललन राजभर (वय ३८, रा. उत्तरप्रदेश)

४. परमेश्वर सहानी (वय २५, रा. उत्तरप्रदेश)

५. प्रदीप रॉय (वय ४५, रा. वेस्ट बंगाल)

६. राजेश शर्मा (वय ३२, रा. उत्तराखंड)

७. संतोष जैन – प्रमुख (वय ३५, रा. तामिळनाडू)

८. राधेश्याम यादव (वय ४०, रा. उत्तरप्रदेश)

९. आनंद यादव (वय २५, रा. उत्तरप्रदेश)

१०. पप्पु कुमार (वय ३०, रा. बिहार)

११. कनन (वय ४०, रा. तामिळनाडू)

१२. सुब्रन सरकार (वय २३, रा. वेस्ट बंगाल)

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना दुर्घटना, गर्डर बसवणारी क्रेन कोसळली,१४ जणांचा मृत्यू
मध्यरात्रीच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री २३:०० ते ००:०० वाजताच्या दरम्यान, सातगाव पुल, सरळ आंबेगाव, शहापूर, ठाणे. या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील ब्रीजचे काम सुरू असताना महामार्गावरील क्रेन तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला आहे. सदर घटनास्थळी स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे. ही घटना रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घडल्याची माहिती आहे.

सदर क्रेन घटनास्थळी काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडल्यामुळे काही कामगार क्रेन खाली अडकले आहेत. सदर घटनेत १४ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ०३ व्यक्ती जखमी असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. सदर माहिती ही प्राथमिक माहिती असून, सदर माहिती महसूल सहाय्यक, शहापूर यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.

विधानपरिषदेच्या १२ आमदार नियुक्तीबद्दल बाजू मांडा, उच्च न्यायालयाचे शिंदे सरकारला आदेश, नेमकं काय घडलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here