गेल्या काही दिवसांपासून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर, छोट्या पुलांवरून पाणी वाहत आहे. वाहनचालकांनी रस्त्यावर पाणी असल्यास वाहन पाण्यात घालू नये; तसेच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांनी केले आहे.
भीमाशंकरकडे जाणारा रस्ता सोमवारी शिनोली-नेवाळवाडी येथे खचला. त्यामुळे सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्यास कोलदरा-अमोंडीमार्गे वाहतूक वळवली जाईल. याशिवाय वाहतुकीसाठी अजून काही पर्याय समोर येतो का, यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. लवकरात लवकर वाहतूक सुरळीत होईल यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते.
बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर
भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.
भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे.