पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी; तसेच शहर सुरक्षित करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी शहरात स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. त्या अंतर्गत १८ पोलिस ठाणी कार्यान्वित करण्यात आली; तरीही शहरातील काही भागांत तरुण गुन्हेगारी करताना आढळतात. अनेक तरुणांनी आपली स्वतःची अशी गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. हे तरुण टोळी पद्धतीने अनेक लहान-मोठे गुन्हे करताना आढळले आहेत. पोलिसांनी यातील अनेकांना अटक करून कारवाई केली होती. मात्र, या टोळ्यांच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नव्हत्या. त्यामुळे शहरातील सर्व गुन्हेगारी टोळ्या समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कडक पावले उचलली आहेत.
अनेक गुन्हेगार ‘अंडरग्राउंड’
जानेवारी महिन्यापासून पोलिस आय़ुक्तांनी या टोळ्यांवर ‘मकोका’ लावून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी ते जुलै अखेरपर्यंत सुमारे २४ टोळ्यांवर ‘मकोका’ लावून २२६ अट्टल गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेक गुन्हेगार भीतीने ‘अंडरग्राउंड’ झाले आहेत. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी कारवाया रोखण्यास मदत होत आहे.
कारवाया झालेल्या टोळ्या
शुभम ऊर्फ कान्हा सुरेश म्हस्के व १७ साथीदार, दत्ता बाबू सर्यवंशी व तीन साथीदार, हेमबहादूर टेकबहादूर हमाल ऊर्फ हिरा ऊर्फ सुमन व साथ साथीदार, अनिल तुकाराम मोहिते व ११ साथीदार, आकाश ऊर्फ कपाळ्या राजू काळे व सहा साथीदार, विशाल विष्णू लष्करे व ३० साथीदार, कुणाल ऊर्फ बाबा धीरज ठाकूर व २९ साथीदार, राहुल पंडित ऊर्फ राहुल भय्या, राहील महंमद कुरेशी व ११ साथीदार, शाहरुख य़ुनुस खान व ४ साथीदार, अविनाश बाळासाहेब गोठे व चार साथीदार, अतुल ऊर्फ चांड्या अविनाश पवार व दोन साथीदार, अनिल जगन जाधव व सहा साथीदार, बाबा सैफन शेख व आठ साथीदार, जय ऊर्फ कीटक प्रवीण भालेराव व पाच साथीदार, रामा परशुराम पाटील व दोन साथीदार, प्रमोद सोपान सांडभोर व सहा साथीदार, करण रतन रोकडे व १२ साथीदार, आकाश वजीर राठोड व तीन साथीदार, अमोल ऊर्फ धनज्या गजानन गोरगले व तीन साथीदार, अमर ऊर्फ रिंकू कुलवंतसिंग चौहाण व चार साथीदार, यशवंत ऊर्फ अतुल सुभाष डोंगरे व सात साथीदार, सुधीर अनिल परदेशी व पाच साथीदार, सौरभ संतुराम मोतीरावे व तीन साथीदार.