आयपीएल सुरु होण्यापूर्वीच दुखापतींनी दुसरी विकेट काढल्याचे पाहायला मिळत आहे. या दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघातील या खेळाडूला आता यावर्षी आयपीएल खेळता येणार नाही, असे समजते आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा हॅरी गर्नीही दुखापतीमुळे यंदाचे आयपीएल खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाचा-

दिल्लीने या खेळाडूला दीड कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात सामील करून घेतला होता. शिखर धवनबरोबर तो सलामीला येईल आणि संघाची समस्या दूर करेल, असे दिल्ली कॅपिटल्स संघाला वाटले होते. पण हा खेळाडूंच दुखापतग्रस्त झाल्यामुळे आता त्याला आयीपीएलमध्ये खेळता येणार नाही.

वाचा-

आतापर्यंत एक दमदार सलामीवीर म्हणून जेसन रॉयने चांगले नाव कमावले आहे. त्यामुळेच दिल्लीच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. पण स्नायू दुखावल्यामुळे आता त्याला आयपीएल खेळता येणार नाही. या दुखापतीमुळे रॉयला पाकिस्तानविरुद्धच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतही खेळता येणार नाही. रॉय दुखापतग्रस्त झाल्यामुळे आता दिल्लीच्या संघाने डॅनियल सॅम्स या डावखुऱ्या गोलंदाजाला संघात स्थान दिले आहे. सॅम्सने आतापर्यंत बिग बॅश लीगमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.

रॉय संघात खेळणार नसल्यामुळे आता शिखर धवनबरोबर कोणता खेळाडू सलामीला येणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. पण दिल्लीच्या संघाकडे सलामीवीराचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. धवनबरोबर अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ किंवा रिषभ पंत हे तीन फलंदाज सलामीला येऊ शकतात.

वाचा-

आपल्या स्लो बॉलसाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज हॅरी गर्नी यावर्षी आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. कारण हॅरीच्या खांद्या दुखापत झाली आहे. त्यामुळे हॅरीला आपल्या खांद्यावर उपचार घ्यावे लागणार आहे. त्यानंतर त्याला काही आठवडे विश्रांती घ्यावी लागेल. पण त्यामुळे त्याला यावर्षी आयपीएल खेळता येणार नाही

आयपीएलसाठी सर्वात आधी दोन संघ युएईला रवाना झाले होते. यामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांचा समावेश होता. या दोन संघांतील सर्व खेळाडूंना सहा दिवस क्वारंटाइन केले होते. या दोन्ही संघांतील खेळाडूंच्या तीन करोना चाचण्या झाल्या. या तिन्ही चाचण्यांमधील खेळाडूंचे करोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे आयपीएलसाठी ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे म्हटले जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here