सेल्सचे काम करतात महेश तोषनीवाल
अलवर गेट ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दातारसिंह मेडतिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश तोषनीवाल हे असून ते सॅनिटायझर विकण्याचे काम करतात. त्यांना एका अनोळखी फोन क्रमांकांवरून फोन आला. आपण नसीराबाद आर्मी कँटचे हवालदार असल्याचे पलिकडील व्यक्ती म्हणत होती. आपल्याला लष्करासाठी सॅनिटायझर खरेदी करायचे असल्याचे ती व्यक्ती म्हणाली. त्यानंतर बोलण्या-बोलण्यात त्या व्यक्तीने तोषनीवाल यांना भावुक बनवले. त्यानंतर त्या व्यक्तीने तोषनीवाल यांच्या बँक खात्याबाबत माहिती मिळवली. त्यानंतर त्या व्यक्तीने थोडी थोडी रक्कम करत त्यांच्या खात्यातून एक लाखांपर्यंत रक्कम काढली. मात्र, आपल्या खात्यातून पैसे काढले गेल्याचा जेव्हा तोषनीवाल यांना मेसेज आला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर तोषनीवाल यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
करोनाकाळात वाढत आहेत ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार
पोलिसांनी तोषनीवाल यांची तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर पोलिसांनी फोन नंबर आणि बँक खात्याच्या आधारावर आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. याबाबत पोलिस विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात करोनाचा उद्रेक झाल्यानंतर बेरोजगारी वाढली. त्यानंतर देशात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सुरू झाले आणि ते वाढत गेले.
क्लिक करा आणि वाचा-
तुमचा चौकसपणा, सावधानताच, तुमची समज तुम्हाला ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवू शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या फोनवर कधीही विश्वास ठेवू नका. या बरोबरच विश्वास वाटत असेल, करत एखाद्याशी दीर्घ बातचित करा, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks so much for the blog post.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
Thank you ever so for you article post.
Thanks so much for the blog post.
Like!! Thank you for publishing this awesome article.