मुंबई: राज्यात गेल्या २४ तासांत ३५५ बाधितांना प्राणास मुकावे लागले आहे. आज दिवसभरात १४ हजार ७१८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर ९ हजार १३६ जण होऊन घरी परतले आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ७ लाख ३३ हजार ५६८वर पोहचली आहे. ( update today )

देश अनलॉकच्या चौथ्या टप्प्याकडे वाटचाल करत असताना व राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात येत असताना करोनाचे दैनंदिन आकडे मात्र तितकेसे समाधानकारक नाहीत. करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी नवीन करोना बाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. महाराष्ट्राचा विचार केल्यास आजही देशातील सर्वाधिक बाधित रुग्ण महाराष्ट्रातच आहेत.

राज्यात गेल्या २४ तासांत करोनाने आणखी ३५५ जणांचा बळी घेतला त्याचवेळी १४ हजार ७१८ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ३८ लाख ६२ हजार १८४ जणांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यातील ७ लाख ३३ हजार ५६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १८.९९ टक्के इतके आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार १३६ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले. हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ५ लाख ३१ हजार ५६३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ७२.४६ टक्के इतके झाले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here