भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आता यावर्षीच्या आयपीएलमध्ये नव्या भूमिकेमध्ये पाहायला मिळू शकतो, असे दिसत आहे. या वर्षीच्या आयपीएलमध्ये अजिंक्य नेमके काय नवीन करताना दिसणार आहे, पाहा…

वाचा-

अजिंक्य यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघात होता. पण या वर्षी झालेल्या लिलावात अजिंक्यला दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या संघात सामील करून घेतले आहे. दिल्लीच्या संघात अजिंक्यबरोबर शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिमरॉन हेटमायरसारखे फलंदाज आहेत.

आतापर्यंत राजस्थानकडून खेळत असताना अजिंक्य हा सलामीवीर म्हणून जबाबदारी सांभाळत होता. पण आता त्याचा संघ बदलला आहे. त्यामुळे त्याच्याकडे आता नवीन जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. त्यामुळे यावेळी अजिंक्य कदाचित दिल्लीकडून सलामी करताना दिसणार नाही, तर त्याच्याकडे नवीन भूमिका देण्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे. या नवीन भूमिकेसाठी आपण सज्ज असल्याचे अजिंक्यने यावेळी सांगितले आहे.

वाचा-

याबाबत अजिंक्य म्हणाला की, ” आतापर्यंत मी सलामीवीर म्हणून बरेच सामने खेळलो आहे. त्याचबरोबर डावाची सलामी करण्याचा आनंदही घेतला आहे. पण दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना मला सलामीला यायला मिळेल की नाही, हे मी सांगू शकत नाही. जेव्हा आमचा मैदानात सराव सुरु होईल आणि रणनिती आखायला सुरुवात होईल, तेव्हा या गोष्टी स्पष्ट होऊ शकतील. पण संघ व्यवस्थापन मला जी भूमिका देईल ती पार पाडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.”

अजिंक्य जर सलामीला आला नाही तर त्याच्याकडे कोणती भूमिका दिली जाऊ शकते, हे अजून समजलेले नाही. याबाबत अजिंक्य म्हणाला की, ” मला जर सलामी करण्याची संधी दिली नाही तर मला कदाचित ५ किंवा ६ या क्रमांकावर फलंदाजीला पाठवू शकते. या क्रमांकावर खेळायला येऊन मॅच फिनिशरची भूमिका मला देण्यात येऊ शकते. माझ्यासाठी ही नवीन भूमिका असेल. मला खेळाचा विस्तार करायला यामुळे नक्कीच मदत होईल. या गोष्टीसाठीही मी तयार आहे.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here