मुंबई: मृत्यू प्रकरणात रोज नवीन गोष्टी घडत आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेली सुशांतची गर्लफ्रेंड हिची एक मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मुलाखतीदरम्यान रियानं अनेक गोष्टींचा खुलासा केला असून तिनं सुशांतची गर्लफ्रेंड हिच्यावरही निशाणा साधला आहे.

गेल्या चार वर्षांपासून सुशांत आणि अंकिता संपर्कात नव्हते, असं असताना अंकिता अचानक त्याच्याबद्दल का बोलतेय, असा प्रश्न रियानं उपस्थित केला आहे. अंकिता देखील अनेक खोट्या पसरवत असल्याचं तिनं म्हटलं आहे. सुशांतच्या घरात राहून तिनं कोणत्या घराचे कागदपत्रं दाखवले आहेत, असा टोला देखील रियानं अंकितावर लावले आहेत.जर मी सुशांतच्या पैशांवर ताबा मिळण्याचा प्रयत्न केला असता तर पहिल्यांदा अंकिता राह त असलेल्या घराचे हफ्ते थांबवले असते, असंही रिया म्हणाली.

एकदा अंकिता म्हणते की, सुशांतसोबत ती चार वर्षांपासून बोलत नव्हती, आणि परत म्हणते सुशांतनं तिला ‘मणिकर्णी’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान फोन केला होता., असं रियानं म्हटलं आहे.

सुशांतसिंह राजपूतचा १४ जून मृत्यू झाला होता. सीबीआय आणि ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सीबीआयने सुशांतच्या घरी जाऊन पुन्हा क्राइम सीन रि-क्रिएट केला. तर ईडीने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ-वडिलांकडे चौकशी केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here