नवी दिल्ली : आयकर (इन्कम टॅक्स) रिटर्न भरण्याची शेवटची तारीख मागे गेली आहे. कोणत्याही दंडाशिवाय आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख करदात्यांसाठी ३१ जुलै २०२३ होती. परंतु अजूनही अनेक लोक काही करणास्तव आयकर रिटर्न भरू शकलेले नाहीत, पण अशांना अजूनही आयकर रिटर्न भरण्याची एक संधी आहे. यासाठी लोकांना एक प्रक्रिया अवलंबावी लागेल. जर करदात्यांना २०२२-२३ या आर्थिक वर्षातील त्यांची कमाई उघड केली नसेल, तर ते आता विलंब शुल्क भरून आयकर रिटर्न भरू शकतात. त्यासाठीही तारीख निश्चित केली असली असून यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही.

ITR Filing: वेळेवर रिटर्न दाखल करूनही आयटीआर पडताळणीची अंतिम मुदत चुकल्यास दंड भरावा लागेल
या तारखेपर्यंत विलंबित ITR फाइल करा
३१ जुलैपर्यंत जे करदाते इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करू शकले नाहीत त्यांना आता ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विलंबित आयकर रिटर्न फाईल करण्याची संधी आहे. पगारदार करदाते ज्यांचे वार्षिक करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्यांना ५००० रुपये तर पाच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक करपात्र उत्पन्न असलेल्या करदात्यांना एक हजार रुपये दंड भरून टॅक्स रिटर्न दाखल करणे बंधनकारक आहे.

ITR भरण्याची शेवटची तारीख हुकली? आता लागणार हजारोंचा दंड, पाहा कोणी आणि किती द्यायचे शुल्क?
६.५० कोटीपेक्षा जास्त ITR दाखल
इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यावर प्रतिकार विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार मूल्यांक वर्ष २०२३-२४ साठी सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ६.५० कोटीहून अधिक आयकर रिटर्न दाखल करण्यात आले असून करदात्यांना शेवटच्या दिवशी ऑनलाइन आयकर रिटर्न भरण्यात कोणतीही अडचण आली नसल्याचा दावा विभागाकडून करण्यात आला आहे. सोमवारी शेवटच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ३७ लाख लोकांनी आयकर रिटर्न भरले. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचा परतावाही ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून जारी केला जाईल. प्राप्तिकर विवरणपत्रे जशी भरली जात आहेत, त्याच प्रमाणात त्याचे मूल्यांकनही केले जात आहे.

ITR Filing: टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत चुकवण्याची वास्तविक किंमत दंडापेक्षाही अधिक
आयकर रिफंड कधी मिळणार
जर तुम्ही मुदतीपूर्वी तुमचे आयकर रिटर्न भरले असेल तर तुम्हाला गस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून रिफंड मिळेल. ऑगस्टअखेर परतावा देण्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ३१ जुलैपर्यंत सुमारे ५.८३ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. दरम्यान जर तुम्हाला टॅक्स रिटर्न भरताना अडचण होत असेल तर आयकर विभागाच्या हेल्पडेस्क आणि वेबसाइटवर चोवीस तास सेवा आहेत ज्या तुम्हाला ITR फाइल करण्यात मदत करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here