‘कॉंग्रेसच्या अंतर्गत कामकाजात ज्या कुणाला खरच रस असेल तो प्रत्येक राज्य आणि जिल्हाध्यक्ष निवडला जावा, या आमच्या प्रस्तावाचं स्वागत करेल. संपूर्ण कॉंग्रेस कार्यकारिणी नव्याने निवडली जावी, असं आझाद म्हणाले. ‘पक्षातील फेररचना आणि सुधारणांबाबत लिहिलेल्या पत्राबाबत सुरुवातीला त्यांना (राहुल गांधी) काही समस्या होत्या. पण नंतर सोनियाजी आणि राहुलजीनी याबाबत स्पष्टता आणली. निवडणुका एका महिन्यात होणार होत्या. मात्र कोरोनामुळे ते शक्य नाही. म्हणून आम्ही ६ महिन्यांसाठी सोनियाजींना पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली, असं आझाद यांनी सांगितलं.
इंदिरा गांधीजींचा काळातील घटनेची आठवण करून दिली
पत्र लीक प्रकरणावर आझाद यांनी स्पष्टीकरण दिलं. पत्र लीक झालं असलं तरी त्यामुळे असं काय झालं? पक्ष बळकट करण्यासाठी आणि निवडणुका घेण्याची सूचना करणं यात कोणतंही गुपित नाही. इंदिरा गांधीजींच्या काळातही मंत्रिमंडळाची कार्यवाही लीक झाली होती, असं आझाद म्हणाले.
‘आम्ही कुणाला शिवीगाळ केली नाही’
शिस्तभंगाच्या आरोपवरही आझाद यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान जे भाष्य करण्यात येत होतं तो शिस्तभंग नाही का? पत्र लिहिल्यावरून काही जण आम्हाला शिवीगाळ करत होते, तो शिस्तभंग नव्हे का? त्यांच्यावर कारवाई का होऊ नये? आम्ही कोणालाही शिवीगाळ केला नाही, असं गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं. कपिल सिब्बल, मनीष तिवारी आणि गुलाम नबी आझाद यांच्यासह २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्ष संघटनेत व्यापक फेरबदल, सामूहिक नेतृत्व आणि पूर्णवेळ अध्यक्ष हवा आहे, अशी भूमिका मांडली होती. या पत्रावरून काँग्रेसमध्ये जोरदार वाद रंगला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times