कोल्हापूर: जिल्ह्यात करोनाचा कहर वाढतच असून त्याला रोखण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या पोलीस दलातील एकाचा गुरुवारी बळी गेला. जिल्ह्यात दिवसभरात ७३५ जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आज तब्बल २९ जणांचा करोनाने बळी घेतला. जिल्ह्यातील करोना बळींची आतापर्यंतची संख्या ६०० वर पोहचली आहे. दरम्यान, येथील दत्त सहकारी साखर कारखान्याने राज्यातील पहिले उपचार सेंटर सुरू करण्यात आले आहे. ( )

वाचा:

जिल्ह्यातील करोना बधितांचा आकडा वीस हजारावर गेल्यामुळे जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात करोना बाधित रुग्णाचा आकडा प्रचंड वाढत आहे. उपचारासाठी रुग्णालय कमी पडत असून अनेकांवर घरातच उपचार करावे लागत आहेत.

गेले तीन महिने पोलिस करोना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामध्येच त्यांचा अनेकांशी संपर्क येत असल्याने जिल्ह्यात १८० पोलिसांना संसर्गाची बाधा झाली आहे. यातील १३० पोलीस बरे झाले असले तरी अजूनही पन्नास पोलिसांवर उपचार सुरू आहेत. हातकणंगले तालुक्यातील शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल संजीत जगताप यांचा करोनाने गुरुवारी बळी घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलीस दलातील हा जिल्ह्यातील पहिला बळी आहे. यामुळे पोलीस दलात चिंता व्यक्त केली जात आहे.

वाचा:

साखर कारखान्यातील पहिले कोविड सेंटर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी सातारा येथे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी, साखर कारखानदार व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. सर्व साखर कारखान्यांनी कोविड उपचार केंद्र सुरू करावेत, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनीही जिल्ह्यातील साखर कारखान्यांना आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद देत शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याने कोविड उपचार केंद्र सुरू केले आहे. पंचवीस बेडचे हे सेंटर असून चार दिवसात तेथे १०० बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या केंद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील उपस्थित होते. साखर कारखान्याच्या वतीने सुरू झालेले हे राज्यातील पहिलेच कोविड सेंटर आहे.

> जिल्ह्यात १७४ ठिकाणी करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय तसेच डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल आघाडीवर आहे. माणुसकीचा धागा घट्ट करत येथे २०० पेक्षा अधिक बेड उपलब्ध करून करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. करोना चाचणीची सुविधाही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉ. डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २०० पेक्षा अधिक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची टीम येथे कार्यरत आहे.

> जिल्ह्यात अक्सिजन बेडची सुविधा अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी सध्या प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी आणि जिल्हा परिषदेचे चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन करोना रोखण्यासाठी कार्यरत आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here