नवी दिल्ली : शारीरिक अक्षमता एका व्यक्तीच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकते असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी श्रीकांत बोल्ला एक आदर्श आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी श्रीकांत बोल्लाचे नाव पहिल्यांदाच ऐकले असेल. श्रीकांत बोल्ला एक लोकप्रिय अंध व्यावसायिक आहेत, ज्यांनी आपल्या जीवनातील अनेक अडचणींवर मात करून जगात काहीही अशक्य नाही हे सिद्ध केले. श्रीकांतने अंधत्वाला कधीही आपल्या यशाच्या मार्गावर अडथळा बनू दिले नाही आणि आज कोट्यवधींचा मालक झाला.

कोण आहे श्रीकांत बोल्ला?
७ जुलै १९९२ रोजी आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टणम शहरातील सीतारामपुरम येथे जन्मलेला श्रीकांत बोल्ला लहानपणापासूनच अंध आहेत. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. महिन्याला १६०० रुपये कमावणाऱ्या कुटुंबात अंध मुलाच्या जन्माने निराशा पसरली. कोणतंही मुलं जन्माला आलं की घरात आनंदाचं वातावरण असतं, परंतु श्रीकांतच्या जन्माने नातेवाईक आणि शेजारील लोक हिरमुसून गेले आणि तोंडाला येईल ते बोलू लागले. श्रीकांतच्या कुटुंबीयांना त्याला मारण्याचा सल्ला दिला पण सर्व विरोध झुगारून आई-वडिलांनी काहीही झाले तरी मुलाचा सांभाळ करायचा, असा निर्धार केला.

UPSC ची तयारी करताना कल्पना सुचली अन् गर्ल्स हॉस्टेलसमोर दुकान टाकलं; आज १५० कोटींची उलाढाल
शिक्षणात अडचण अन् कायदेशीर लढाई
बोल्लाची नेहमीच अभियंता बनण्याची इच्छा होती आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी त्याला विज्ञान आणि गणिताचे शिक्षण हवे होते. तथापि, त्याने गणित आणि विज्ञानाचा अभ्यास करणे कायद्याच्या विरुद्ध असल्याचे मानणाऱ्या अनेक शाळांनी त्याला अंध असल्यामुळे दाखला देण्यास नकार दिला.

शैक्षणिक संस्थांकडून नाकारले गेल्यानंतर बोल्ला यांनी आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात शिक्षणाचे नियमन करणाऱ्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी अपील केले जेणेकरून अंध विद्यार्थी गणित आणि विज्ञानाचा अभ्यास करू शकतील. बोल्लाने त्याचा खटला जिंकला, ज्याचा त्यांना खूप आनंद झाला. यानंतर बोल्ला यांनी राज्य मंडळ शाळेत शिक्षण घेत गणित आणि विज्ञानाचा अभ्यास केला आणि सरासरी ९८% गुण मिळवले. परंतु त्याचे प्रयत्न त्याला आयआयटीमध्ये दाखला मिळवून देऊ शकले नाही.

कोण आहेत थॉमस कुरियन? IIT ड्रॉपआउटने श्रीमंतीत बॉस सुंदर पिचाईला पण मागे टाकले
आयुष्यातील टर्निंग पॉइंट
IIT मध्ये दाखला घेण्याच्या रस्त्यात पुन्हा एकदा बोल्लाचे अंधत्व अडथळा बनले. त्यानंतर त्याने अमेरिकेतील सर्वोत्तम तांत्रिक शाळांपैकी एक असलेल्या MIT मध्ये अर्ज केला आणि त्याची निवड झाली. भारतातील पहिला अंध विद्यार्थी आणि देशाबाहेरील पहिला अंध विद्यार्थी म्हणून बोल्लाला एमआयटीमध्ये प्रवेश मिळाला. अंध असल्यामुळे त्याला अभ्यासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, पण त्यांनी साम-दाम, दंड भेद वापरून शिक्षण पूर्ण केले. यासह MIT मधून उत्तीर्ण होणारा तो पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी ठरला.

करून दाखवलं! पाच स्टार्टअप बुडाले, पण हार मानली नाही अन् बनवला ९८०० कोटींची उलाढाल असलेला ब्रँड
सुरू केला स्वतःचा व्यवसाय
अंध असूनही श्रीकांत पुढे जाण्याचे स्वप्न पाहत राहिले, त्यामुळेच ते २०१२ मध्ये भारतात परतले आणि बोलंट इंडस्ट्रीज सुरू केली. एक वेळ अशी आली जेव्हा रतन टाटांनी श्रीकांत बोल्लाच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. श्रीकांत बोल्ला यांची कंपनी पर्यावरणपूरक पॅकेजिंग वस्तू बनवते. एवढेच नाही तर आपल्या कामाच्या जोरावर श्रीकांतचे नाव फोर्ब्सच्या ३० अंडर ३० आशियाच्या यादीतही मान मिळवला. श्रीकांत भारतातील सगळ्यात तरुण उद्योजकांपैकी एक बनला आहे. श्रीकांत बोल्लाचा व्यवसाय वार्षिक उत्पन्नात तब्बल शंभर कोटींची कमाई करण्याबरोबर शेकडो लोकांना रोजगार देतो.

बालपणापासून अंध असूनही श्रीकांत बोल्ला यांनी जे केले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. संकट काळात जर तुम्हाला सर्वकाही सोडून द्यावेसे वाटत असेल तर एकदा श्रीकांत बोल्लाचा नक्की विचार करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here