नवी दिल्लीः सुदर्शन टीव्ही चॅनेलचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांचा प्रशासकीय सेवेतील अनेक सनदी अधिकारी आणि IPS असोसिएनशनने तीव्र निषेध केलाय. सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांनी ‘घुसोखोरी’ केली आणि सरकारच्या ‘नोकरशाहीत जिहाद’ कसा सुरू आहे? यावर बघा रिपोर्ट अशा आशयाचा एक टिजर व्हिडिओ व्हयरल होतोय. यावर सोशल मीडियातून जोरादर टीक होतेय.

सुदर्शन टीव्ही चॅनेलचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे. ‘नोकरशाहीत जिहाद’ वरील रिपोर्ट उद्या सुदर्शन चॅनेलवर दाखवला जाणार आहे. हा रिपोर्ट द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक आहे. तसंच घटनात्मक संस्था असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगावर (UPSC) प्रश्न उपस्थित करणारा आहे, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

‘IPS असोसिएशन’ ही केंद्रीय सेवेवांमध्ये कार्यरत असलेल्या पोलिस अधिकऱ्यांची संघटना आहे. या संघटनेने चव्हाणके यांच्यावर कारवाईची मागणी केलीय. चव्हाणके यांचा हा रिपोर्ट निषेधार्ह असून जातीय आणि बेजबाबदार पत्रकारीतेचं ठसठसीत उदाहरण आहे, असं आयपीएस असोसिएशनने ()म्हटलं आहे. यासंदर्भारत असोसिएशनने ट्विट केलंय.

केंद्रीय लोकसेवांमध्ये मुस्लिमांनी कशी ‘घुसखोरी’ केली. ‘नोकरशाहीत जिहाद’ संबंधीचा रिपोर्ट पाहा, असं सांगणारा हा व्हिडिओ चव्हाणके यांनी बुधवारी ट्विट केला. यानंतर या वादाला तोंड फुटलं. IAS and IPS मध्ये मुस्लिमांची संख्या अचानक कशी वाढली? अतिशय अवघड परीक्षांमध्येही त्यांना सर्वाधिक गुण कसे मिळाले? ते रँकवर कसे आले? काय आहे या मागचं गुपित? बघा हा रिपोर्ट, असं चव्हाणके या व्हिडिओतून सांगत आहेत.

सुरेश चव्हाणके यांच्याविरोधात न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड अथॉरिटीने कडक कारवाई करावी, अशी मागणी इंडियन पोलीस फाउंडेशने केली आहे. ‘नोकरशाहीत जिहाद’ हा रिपोर्ट IAS/IPS होणाऱ्या अल्पसंख्यकांविरोधी आणि विषारी भाष्य करणारा आहे. हा व्हिडिओ रिट्विट करू नये. तसंच उत्तर प्रदेश पोलीस आणि न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड अथॉरिटीने यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी () भारतीय पोलीस फाउंडेशनने ट्विट करून केलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here