सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातल्या कणकवली तालुक्यातील छोट्याशा चिंचवली गावातील एम. बी. ए. फायनान्स केलेल्या मंदार पेडणेकर या तरुणाने आपल्या मूळ गावी पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. मंदार पेडणेकर या तरुणाने आपल्या वडिलोपार्जित दीड एकर जमिनीमध्ये हा प्रोजेक्ट उभा केला. मूळ शेड ही आठ गुंठामध्ये साकारली आहे. सध्या हा पोल्ट्री फार्म यशस्वीपणे सुरू आहे.
महाराष्ट्रात आणखी एका ठिकाणी सापडला कातळशिल्पांचा खजिना, ‘क्रॉस’च्या आकाराची चित्रकृती निदर्शनास
कोविड सुरू झाला आणि मुंबईतील जॉब सेक्युरिटी नाहीशी झाली होती. कोविड काळात प्रत्येक जण व्यवसायाच्या शोधात होते. कोविड कालावधीत विविध व्यवसायाची चाचपणी सुरू होती. त्यातून त्याने पोल्ट्री फॉम् सुरू करण्याचा ठरवले. कोंबडी लेहर पोल्ट्री फार्म मध्ये रिक्स कमी आहे. म्हणून आपण कोंबडी लेहर पोल्ट्री व्यवसाय सुरू केला, असे मंदार म्हणाला.
तिलारीच्या जंगलात आढळला आकर्षक गुलाबी रंगाचा खेकडा, तेजस ठाकरे यांचा शोध
या पोल्ट्री फार्ममध्ये दहा हजार पक्षी आहेत. या कोंबड्यापासून नऊ हजार दोनशे अंडी दिवसाला मिळतात. या अंड्यापासून महिन्याला निव्वळ नफा एक लाख वीस हजार रुपये मिळतो. सध्या ही अंडी लोकल मार्केटमध्ये विकली जातात. सध्या पेडणेकर यांच्याकडे सहा कामगार काम करतायेत. सहा कामगारांना महिन्याला तीस हजार रुपये पगार देण्यात येता. आणि महिन्याला दोन लाखापर्यत एकूण उलाढाल होते.

मुसळधार पावसामुळे शेतीच्या कामाला वेग,कोकणातील विहंगम दृश्य ड्रोनमध्ये कैद

पोल्ट्री प्रोजेक्ट उभा करण्यासाठी मंदारला ६० ते ६५ लाख रुपये खर्च आला. त्याचे वडील सेंट्रल गव्हर्नमेंट कार्यरत होते. मार्चमध्ये मंदारचे वडील सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीतून मिळालेल्या रकमेतून हा प्रोजेक्ट त्याने उभा केला. वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी मला मुंबईला नोकरी कर किंवा व्यवसाय सुरू कर असं सांगितलं होतं. वडिलांच्या पुण्याईमुळे मी हा व्यवसाय सुरू करू शकलो, असं मदार म्हणाला.

कोंबड्यांसाठी लागणारं खाद्य आम्ही स्वतःच बनवतो. मका, सोयाबीन पेंड, स्टोन ग्रीड तसेच मेडिसिनमध्ये विविध घटक मिक्स असतात. कच्च खाद्य बाहेरून मागवलं जातं. कोंबड्यांना दिवसाला अनेक टन खाद्य लागतं. एक कोंबडी १०० ग्रॅम खाद्य खाते, अशी प्रतिक्रिया मंदार पेडणेकरने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here