मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या मंत्रालयाजवळील मनोरा आमदार निवासाचे भूमिपूजन आज (गुरुवार) होत आहे. विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना राहण्यासाठी ४० आणि २८ मजल्यांच्या दोन इमारती इथे बांधल्या जातील. या इमारतीमध्ये जिम, कॅफेटेरिया, हायटेक किचन तसेच प्रशस्त सभागृह बांधले जाणार आहे. इमारतीच्या बांधकामावर साधारण १३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता मनोरा आमदार निवासाच्या बांधकामाचा शुभारंभ होईल. पुढच्या तीन वर्षात मनोरा आमदार निवासच्या नव्या इमारतीचं काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. बुधवारी रात्री विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार निवासाच्या शुभारंभाची माहिती दिली.

मनोरा आमदार निवासाच्या इमारती धोकायदायक बनल्याने पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले होते. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जुलै २०१९ मध्ये भूमीपूजनही पार पडले होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मविआ सरकारने मनोरा पुनर्विकासाचे काम केंद्राच्या नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनकडून काढून घेऊन ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले. मविआ सरकारने मनोरा आमदार निवासच्या इमारतीचा जुना आराखडा रद्द केला होता. आता नवा आराखडा वास्तुविशारद शशी प्रभू यांनी तयार केला.

Nitin Desai Death: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या

नवं आमदार निवास कसं असेल?

 • नव्या आमदार निवासाचे २ मोठे टॉवर असणार आहेत.
 • एक इमारत २८ मजली, तर दुसरी इमारत ४० मजली असणार आहे.
 • १३ हजार ४२९.१७ चौरस मीटर भूखंड क्षेत्र आहे.
 • मनोरा आमदार निवासासाठी तब्बल ५.४ एफएसआय देण्यात आला आहे.
 • प्रस्तावित बांधकाम बिल्टअप ७ लाख २१ हजार ९५६.०६ चौरस मीटर इतके असणार आहे.
 • नव्या आमदार निवासात प्रत्येक आमदाराला एक हजार चौरस फुटाची सदनिका मिळणार आहे.
 • नव्या आमदार निवासात सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी एकूण ३६८ खोल्या असतील.
 • एकूण ८०९ वाहने पार्क करण्याची क्षमता असणार आहे.

भाजपसोबत सत्तेत, मोदींची १० मिनिटे भेट, दादांकडून पुण्याला मोठं गिफ्ट, ४ प्रकल्प मार्गी लावणारसुविधा कोणकोणत्या असणार?

 • स्वयंपाकगृहे
 • बहुपयोग हॉल
 • प्रत्येक मजल्यावर कॉन्फरन्स हॉल
 • व्हीआयपी लाऊंज
 • फिटनेस सेंटर
 • कॅफेटेरिया
 • बिझनेस सेंटर
 • कॅफेटेरिया
 • बुक स्टोअर
 • लायब्ररी
 • मिनी थिएटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here