म. टा. प्रतिनिधी, नागपूरः जुलै महिन्यापर्यंत आटोक्यात असलेल्या करोना विषाणू प्रादुर्भाव साखळीने आता शहरापाठोपाठ जिल्ह्यातही विस्फोट सदृष्य परिस्थिती निर्माण केली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाण एकीकडे वाढत असले तरी प्रादुर्भावाची साखळी त्यापेक्षा अधिक वेगाने विस्तारली जात आहे. यात जिल्ह्यात गुरुवारी १२७० इतक्या पुन्हा विक्रमी संख्येची नोंद घेण्यात आली. तर आज जिल्ह्यातून १०५४ जण विषाणूच्या मिठीतून बाहेर पडल्यानंतर घरी परतले. या सगळ्या घटनाक्रमात आज दिवसभरात जिल्ह्यात ४५ करोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू नोंदविला गेला.

करोना विषाणू प्रादुर्भाव झाल्यानंतर दगावलेल्यांपैकी ३३ एकट्या शहरातील असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १० आणि जिल्ह्याबाहेरील दोघांचा समावेश आहे. करोनाच्या चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये २६४ जण ग्रामीण भागातील तर १०५४ जण हे नागपूर शहरातील आहेत. सायंकाळी पाच पर्यंत प्राप्त अहवालानुसार आज ४२०२ संशयितांच्या घशातील स्त्राव नमुना तपासला गेला. त्यातील १२७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर २९३२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. सर्वाधिक ५३७ नमुन्यांचा अहवाल अँटिजन रॅपिड टेस्टमधून पॉझिटिव्ह आला. तर ३३३ नमुने खासगीतून, १३३ नमुने मेयोतून, ११८ नमुने मेडिकलमधून, निरीतून ९४ तर एम्समधून ५५ नमुन्यांत करोनाचा अंश सापडला.

सध्याच्या स्थितीत संपूर्ण जिल्ह्यात ९०९८ सक्रिय करोना बाधित नागरिक आहेत. त्यापैकी ७०३६ एकट्या शहरातील तर २०६२ ग्रामीण भागातील आहेत. तर उर्वरित ५६६८ जणांना करोनाची लागण झालेली असली तरी सौम्य लक्षणेही नसल्याने घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

करोनाची बाधा होऊन उपचारादरम्यान गुरुवारी मेडिकलमध्ये १४ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. यात भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील ५२, शहरातील ४०, दिघोरीजील २७, मेहंदी बाग येथील ४५, मानस मंदिर नारी रोड येथील ७५, रामबाग इमामवाडा येथील ५०, अंबा नगर मानेवाडातील ६०, हिवरी नगर येथील ७५, विठ्ठल नगर हुडकेश्वर येथील ५४ वर्षीय पुरुषांसह गोरोबा मंदिराजवळी ७७, छत्रपती चौकाजवळील विश्राम नगरातील ७४, ६९, चंद्रपूर येथील ३४, २१ वर्षीय तरुणीचा समावेश आहे.

आजचे पॉझिटिव्ह- १२७०
आतापर्यत पॉझिटिव्ह- २४,७६५
आज तपासलेले नमुने- ४२०२
आजचे निगेटिव्ह- २९३२
आज करोनामुक्त- १०५४
एकूण करोनामुक्त- १४७६३
जिल्ह्यातील आजचे पॉझिटिव्ह-२६४

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here