म.टा. प्रतिनिधी नाशिक : पावसाने ओढ दिल्याने मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरण व तळवाडे साठवण तलावातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली होती. त्यामुळे शहरावर पाणीसंकट ओढवण्याची चिन्हे निर्माण झाली होती. दरम्यान, जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या १८१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यासह गिरणा खोरे धरण समूह क्षेत्रातही पावसाची हजेरी कायम असल्याने गेल्या महिन्याभरात गिरणा धरण व तळवाडे साठवण तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे तूर्तास तरी मालेगावकरांवरील पाणीटंचाई संकट टळले आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात गेल्या महिनाभरात ११ टक्के वाढ झाली असून, सध्या धरणात ६ हजार ७०८ दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. शहराला धरणातून वार्षिक ९०० दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध असतो. आतापर्यंत त्यातील ७५० दलघफू पाणी उपसा झाला आहे. गेल्या महिनाभरात गिरणा धरणातील पाणीसाठ्यात झालेली वाढ लक्षात घेता उर्वरित १५० दलघफू पाणीसाठा पुढील काळात उपलब्ध होणार आहे. पुढील दोन महिने तरी मालेगावाकरांची पाणीचिंता मिटली आहे.धरण जूनअखेर पाणीसाठा जुलैअखेर पाणीसाठा (टक्केवारीत )चणकापूर २८. ५२हरणबारी ३५. १००केळझर ३३. ८१गिरणा २२. ३३नागासाक्या धरणाजवळ वेश्या व्यवसायम.टा. प्रतिनिधी नाशिक : नांदगाव तालुक्यातील नाग्यासाक्या धरण परिसरात कोंढार शिवारातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.नांदगावपासून पाच किमी अंतरावर नाग्यासाक्या धरण परिसरात एका हॉटेलमध्ये अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण पोलिस पथकाने सापळा रचला. सुरुवातीला डमी गिऱ्हाइक पाठविण्यात आले. १३०० रुपयांत व्यवहारही ठरला. त्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकून देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांनी हॉटेलचालक अख्तार सोनावाला, भालू मुल्ला यांच्यासह पीडित महिलेवर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक अंकिता बावीस्कर, हवालदार रावसाहेब कांबळे, नितीन डावखर, शिपाई रामराजे, मनीषा कुंझरे यांनी हा छापा टाकला.कुशावर्तामधील पाणी उपसल्याने धोंडा स्नानास आलेल्या भाविकांचा हिरमोडम. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : अधिक महिना सुरू असल्याने कुशावर्तावर स्नान करण्यासाठी दररोज हजारो भाविक येत आहेत. त्यामुळे कुशावर्त अस्वच्छ झाले होते. त्यामुळे पाण्यात स्नान करण्यास भाविक धजावत नव्हते. अखेर बुधवारी नगरपालिका प्रशासनाने कुशावर्तातील सर्व पाणी उपसले आणि ते स्वच्छ केले. स्वच्छतेस सकाळी ११ वाजेनंतर सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आलेल्या भाविकांचा कुशावर्तात पाणी नसल्याचे पाहून हिरमोड झाला. काहींनी तळाला असलेल्या गढूळ पाण्यात स्नान केले, तर काहींनी पाणी उपसतांना शेजारच्या कुंडात सोडले जाते, तेथे गर्दी करीत हातपाय धुतले.कुशावर्त तीर्थ स्वच्छ करण्यासाठी सिंहस्थ २०१५ मध्ये तीन कोटी रुपयांचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पात पाणी स्वच्छ करणे, तसेच त्यात पुरेशा प्रमाणात प्राणवायू मिसळणे अशी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली होती. वर्षभराने हा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून त्र्यंबक नगरपरिषदेला हस्तांतरीत करण्यात आला. त्यानंतर अल्पावधीत तो बंद पडला. कुशावर्तात असलेल्या नऊ लाख लिटर पाण्याचे दर तासाला एक लाख लिटर या वेगाने शुद्धीकरण करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी तो निकामी ठरला आहे. सध्या कुशावर्त स्वच्छ करायचे म्हणजे संपूर्ण नऊ लाख लिटर पाणी बाहेर उपसायचे आणि गंगासागर तलावातील पाण्याने ते पुन्हा भरायचे, असा प्रयोग केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here