पुणेः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांनी उत्सव मंडपात आणि मंदिराच्या परिसरात गणपती विर्सजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आता पुण्यातील ५० गणेश मंडळांनी देखील हाच निर्णय घेतला असून, मंदिराच्या जवळ उभारलेल्या हौदात किंवा पालिकेच्या फिरत्या हौदांमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घेतला आहे.

हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट, हत्ती गणपती मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ, जिलब्या मारुती मंडळांसह उपनगरातील सुमारे ५० मंडळांनी हा निर्णय घेतला आहे. मिरवणूक नसल्याने मंडळांनी साधेपणाने बाप्पाचे विर्सजन करण्याचे ठरविले आहे. यावर्षी मंडळांनी उत्सव मंडप उभारले नाही आणि आता ही मंडळे मंदिरातील परिसरात विसर्जन करणार आहेत. सर्व मंडळांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

याविषयी हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, यंदाच्या वर्षी शहर आणि उपनगरातील 50 मंडळांनी देखील हौदात विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मंडळे मंदिरात स्वत:च्या खर्चातून हौद उभारुन तर काही मंडळे पालिकेच्या फिरत्या हौदांमध्ये विसर्जन करणार आहेत. यंदा साधेपणाने आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. कोरोनापासुनची खबरदारी म्हणून सर्व मंडळांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. आम्ही मंडळांना उत्सव मंडप न उभारण्याचे आवाहन केले होते. त्यालाही प्रतिसाद मिळाला होता.

यावर्षी गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच करण्यात आली. उत्सव मंडप न उभारता आम्ही साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहोत. गर्दी होऊ नये आणि कोरोनापासून खबरदारी म्हणून आम्ही मंदिर परिसराच हौदात विसर्जन करणार आहोत. आम्ही मंदिर परिसरात हौद उभारणार असून, सरकारचे सर्व नियम पाळणार आहोत. हौद उभारणीला आम्ही सुरुवात करणार आहोत. सगळी मंडळे एकत्र आली असून, हा एक चांगला बदल आहे.
– श्याम मानकर, अध्यक्ष, हत्ती गणपती मंडळ

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here