साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केले नाही. अलीकडच्या काळात यासंबंधी पाथरीचा उल्लेख होऊ लागल्याने शिर्डीतून त्यासाठी वेळावेळी विरोध झाला आहे. साईसमाधी शताब्दी सोहळ्यातही राष्ट्रपतींच्या भाषणात हा उल्लेख आला होता. त्यावेळीही ग्रामस्थांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासोबत राष्ट्रपतींची भेट घेऊन खुलासा केला होता.
पाथरीच्या विकासाला मदत करण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र पाथरी या गावाचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख करण्याला साईभक्त आणी शिर्डीकरांचा आक्षेप आहे, असे शिर्डीकरांचे मत असल्याचे कमलाकर कोते यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे हे साईबाबांचे भक्त आहेत, त्यांनी शिर्डीकरांच्या या भावना जाणून घ्याव्यात, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. त्यासंबंधीची भूमिका ग्रामस्थांकडून शनिवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times